VIDEO : कर्नाटकात कोरोनाची भयावह परिस्थिती; अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग

VIDEO : कर्नाटकात कोरोनाची भयावह परिस्थिती; अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग

कर्नाटकातील एक VIDEO समोर आला असून हा पाहून हादराच बसेल.

  • Share this:

बेळगाव, 22 एप्रिल : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असतानाच दक्षिण भारतातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या मानाने कर्नाटक राज्यात मात्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कर्नाटक राज्यात राज्य सरकारकडून आता कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. एका बंगळुरू शहरात गेल्या चार दिवसांमध्ये पन्नास हजारांहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असल्याने स्मशानभूमी समोर अक्षरक्ष: रुग्णवाहिकेच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी तब्बल वीस-वीस तासांचा कालावधी लागत आहे.

बंगळुर शहरातल्या अनेक स्मशानभूमींसमोर शेकडो रुग्णवाहिका सध्या थांबून आहेत आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी तत्काळ याची दखल घेत निर्बंध लागू करण्याची घोषणा करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे आजच येडियुरप्पा यांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या आठवड्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

हे ही वाचा-पुण्यातील 'हे' रुग्णालय कोरोनाग्रस्तांसाठी ठरतंय वरदान; मृत्यूदर अवघा 0.1 टक्के

बंगळुरू शहरातल्या अनेक स्मशानभूमीसमोर कोरोनामुळे ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यांचे मृतदेह घेऊन रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. मात्र रुग्णांची संख्या इतकी आहे की लवकर अंत्यसंस्कार होऊ शकत नाहीत. अपुरी यंत्रणा असल्यामुळे अंत्यसंस्कार करायला वेळ लागत आहे. त्यामुळेच अनेक स्मशानभूमीसमोर रुग्णवाहिकेच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बेळगाव शहरातही याचे पडसाद उमटले. बेळगावमध्ये दुपारी दोनच्या दरम्यान अचानक पोलीस रस्त्यावर उतरले आणि दुकाने बंद करण्यास करण्यास सांगितले. त्यामुळे व्यापारीही काही काळ संभ्रमात सापडले होते.

कालच कर्नाटक राज्य सरकारने नाईट कर्फ्यु लागू केला आहे, तर महाराष्ट्र आणि गोव्याची सीमाही सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक राज्यातही कडकडीत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: April 22, 2021, 5:58 PM IST

ताज्या बातम्या