मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

देशात Corona चा Outbreak..! गेल्या 24 तासात Covid-19 च्या केसेसमध्ये तब्बल 65.7 टक्क्यांनी वाढ

देशात Corona चा Outbreak..! गेल्या 24 तासात Covid-19 च्या केसेसमध्ये तब्बल 65.7 टक्क्यांनी वाढ

Corona Virus In India: अजूनही कोरोनाची (Corona epidemic) महामारी संपेलली नाही आहे. दोन ते तीन महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोनानं (Corona Virus) पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 20 एप्रिल: Corona Virus In India: अजूनही कोरोनाची (Corona epidemic) महामारी संपेलली नाही आहे. दोन ते तीन महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोनानं (Corona Virus) पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे. देशात कोरोनानं पुन्हा चिंता वाढवली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,067 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोविड प्रकरणांमध्ये (Corona patients) 65.7 टक्के वाढ दिसून आली आहे. गेल्या 24 तासात 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह, कोरोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या 522,006 झाली आहे.

देशात आतापर्यंत एकूण 1,86,90,56,607 लसीकरण झाले आहे. गेल्या 24 तासांत 17,23,733 कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 12,340 आहे. गेल्या 24 तासांत 1547 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या 42513248 झाली आहे. मंगळवारी 1,247 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येनंतर केंद्र सरकारनं राज्यांना केलं Alert

केंद्र सरकारने (Central Government) हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि मिझोरामला कोविड -19 च्या (Covid-19 Case)सकारात्मकतेचा दर (Positivity Rate) आणि सतत वाढत असलेल्या प्रकरणांबद्दल सतर्क केलं आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने पाच राज्यांना पत्र लिहून अलर्ट दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं आहे. या पाच राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजनेसाठी पावलं उचलण्याच्या सूचना केल्या आहेत.

महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती?

गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात करताना राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले. या निर्णयाला 20 दिवस उलटत नाहीत तोवर आता केंद्राने पुन्हा एकदा अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्क सक्ती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्बंध लागू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्या बैठकीत याबाबत काय चर्चा होते का? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

First published:

Tags: Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Coronavirus symptoms, Covid19