जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / कधीही Lockdown न लागलेल्या 'या' देशात Corona चा तांडव, एका दिवसात 6 लाख नवे रुग्ण

कधीही Lockdown न लागलेल्या 'या' देशात Corona चा तांडव, एका दिवसात 6 लाख नवे रुग्ण

कधीही Lockdown न लागलेल्या 'या' देशात Corona चा तांडव, एका दिवसात 6 लाख नवे रुग्ण

गुरुवारी कोरोनाचे 6 लाखांहून अधिक नवीन रुग्ण (new corona patients) आढळले. आतापर्यंत जगातील कोणत्याही देशात एकाच दिवसात कोरोना संसर्गाची (corona infection) इतकी प्रकरणे समोर आलेली नाहीत.

  • -MIN READ
  • Last Updated :

दक्षिण कोरिया, 17 मार्च: दक्षिण कोरियामध्ये (South Korea) गुरुवारी कोरोनाचे 6 लाखांहून अधिक नवीन रुग्ण (new corona patients) आढळले. आतापर्यंत जगातील कोणत्याही देशात एकाच दिवसात कोरोना संसर्गाची (corona infection) इतकी प्रकरणे समोर आलेली नाहीत. ही दिलासादायक बाब आहे की, नवीन प्रकरणांची विक्रमी संख्या असूनही दक्षिण कोरिया हा व्हायरसमुळे सर्वात कमी मृत्यूदर असलेल्या देशांमध्ये आहे. सर्वसाधारणपणे कोरोना संसर्गाचा दर जसजसा वाढत जातो, तसतसा त्याचा मृत्यूदर ही वाढतो. मात्र दक्षिण कोरियामध्ये असं दिसून आलं नाही. कोरियाच्या व्हायरस फायटर्सचे म्हणणे आहे की, देशात मोठ्या प्रमाणावर सातत्याने कोविड चाचणी होत असल्याने संसर्गाची इतकी प्रकरणे समोर आली आहेत. कोरियन प्रशासनाने संक्रमित व्यक्तीची प्रकृती गंभीर होण्यापूर्वी जोखीम असलेल्या प्रकरणांची ओळख पटवून रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वाधिक बूस्टर शॉट्स देणारा देश दक्षिण कोरियामध्ये लसीकरण दर 88% आहे. यासोबतच जगातील सर्वाधिक बूस्टर शॉट्स असलेल्या देशांमध्येही त्याचा समावेश आहे. विशेषत: वृद्धांना येथे मोठ्या प्रमाणात बूस्टर डोस देण्यात आला आहे. अत्याधिक लसीकरणामुळे येथील मृत्यूदर 0.14% वर आला आहे, जो दोन महिन्यांपूर्वी 0.88% होता. सध्याचा मृत्यू दर यूएस आणि यूके दरांच्या एक दशांश आहे, जरी त्याच कालावधीत संसर्गाची प्रकरणे 80 पट वाढली आहेत. दक्षिण कोरोनामध्ये कधीही लागलं नाही लॉकडाऊन कोरियाने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अपारंपरिक धोरणावर काम केल आहे. भूतकाळातील महामारीपासून शिकलेल्या धड्यांचा वापर करून, देशाने लवकर चाचणी आणि उच्च-तंत्र संपर्क ट्रेसिंगचा वापर केला. 2020 च्या सुरुवातीपासून येथे 8 मिलियनहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, मात्र कोरियाने कधीही लॉकडाऊन लागू केलं नाही. दरम्यान येथे वृद्धांना लक्ष्य करून वापरल्या जाणार्‍या बूस्टर डोसच्या पुरवठ्यावर भर देण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात