• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय

कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय

ही आहेत कोरोनाची 5 गंभीर लक्षणं,दुर्लक्ष नको

ही आहेत कोरोनाची 5 गंभीर लक्षणं,दुर्लक्ष नको

देशभरता कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा परिणाम (Second Strain of the Corona) झपाट्याने दिसायला लागला आहे. कोरोनाचा दुसरा स्ट्रेन पहिल्यापेक्षा जास्त घातक असल्याचं तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत. कोरोनाच्या सुरवतीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

 • Share this:
  दिल्ली,19 एप्रिल : डॉक्टरांच्या मते कोरोना (Corona) संक्रमणाचा वेग वाढला आहे. तर रुग्णांमध्ये गंभीर लक्षणही दिसत आहेत. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतरही बरेच जण होम क्वॉरटाईन (Home Quarantine ) होउन घरीच उपचार घेत आहेत. कोरोनाचं संक्रमण (Corona infection) कमी असेल तर, घरी उपचार होउ शकतात. मात्र काही वेगळी लक्षण दिसत असतील तर, थेट रुग्णालयात दाखल होणंच चांगलं. ही लक्षणं असतील तर, दुर्लक्ष करु नका. कोरोनाची गंभीर लक्षण मेंदुवर परिणाम झालेने शुद्ध हरपणे गोंधळणे, आळशीपणा, अस्वस्थता, अशक्तपणासारखी लक्ष रुग्णात दिसत असतील त्याला रुग्णालात दाखल करावे. ही लक्षण कोरोनोच्या गंभीर परिणामुळे ब्रेन फंक्शन आणि नर्वस सिस्टम मधील बिघाडामुळे दिसु शकतात. रुग्णाला कोणतीही गोष्ट करताना,बोलताना अडचणी येत असतील तर रुग्णाला उपचारांची गरज आहे.. . छातीत दुखणे छातीत होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वेदनाकडे दुर्लक्ष करू नका. SARS-COV2 च्या अनेक प्रकरणांमध्ये फुप्फुसांच्या म्यूकोसल लाइनिंग (Mucosal Lining) हल्ला झाल्याचं दिसतं आहे. त्यामुळे रुग्णाला छातीत दुखणे,जळजळ होउ लागते. श्वासोच्छवासाचा त्रास श्वास घेण्यात अडथळे, छातीत वेदना ही गंभीर इन्फेक्शनची लक्षण आहेत. कोरोनाची लागण श्वसन संस्थेमधून होते. कोरोना आपल्या श्वासनलीकेवर हल्ला करुन अडथळा निर्माण करतो. चांगल्या पेशी डॅमेज झाल्यामुळे रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. ( हे ही वाचा : रेमडेसिविरचे घटक बनवण्यासाठीही ऑक्सिजनची गरज, औषध निर्मिती उद्योगही अडचणीत) ऑक्सिजन लेव्हल कोरोना रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल घसरली असेल तर, रुग्णाला तत्काळा रुग्णालयात दाखल करावं. संसर्ग झाल्यावर रुग्णाच्या शरीराच्या ऑक्सिजन पातळीवर देखील वाईट परिणाम होतो. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या फुप्फुसांमध्ये द्रव पदार्थ वाढत जातो आणि ऑक्सिजन पातळी घसरते. ओठांचा रंग बदलणे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या ओठांवर आणि चेहऱ्यावर निळसरपणा येतो. हे शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होण्याचे लक्षण आह. वैद्यकीय भाषेत (In Medical Terms) याला हायपोक्सिया म्हणतात. हायपोक्सियामध्ये (Hypoxia) आपल्या ऊतींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे शरिर योग्यप्रकारे कार्य करू शकत नाही. कोरोनाची ही पाच गंभीर लक्षणं मानली जातात. जर ही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर थेट रुग्णालय गाठा . 
  Published by:News18 Desk
  First published: