नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : कोरोना बरा करण्यासाठी देशातील पहिला नेझल स्प्रे तयार करण्यात आला आहे. बुधवारी, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स आणि त्यांच्या भागीदार कॅनेडियन बायोटेक कंपनीने (Biotech Company) हा स्प्रे बाजारात आणला आहे. कोविड-19 (Covid-19) बाधित प्रौढांवर उपचार करण्यासाठी हा स्प्रे प्रभावी ठरेल. हा स्प्रे अशा प्रौढांसाठी आहे ज्यांना संसर्ग झाल्यास गंभीरपणे आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. तत्पूर्वी, याची मान्यता ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून प्राप्त झाली आहे. Fabispray नावाचा स्प्रे नाकातील कोविड-19 चा विषाणू नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, जेणेकरून विषाणू फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकत नाही. ग्लेनमार्कला देशाच्या औषध नियामक, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून उत्पादन आणि विपणनासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. नाकातच व्हायरस मारेल कंपनीचा असा विश्वास आहे की, हा नेझल स्प्रे नायट्रिक ऑक्साईडवर आधारित आहे, जो नाकाच्या वरच्या पृष्ठभागावरील कोरोना विषाणू प्रभावीपणे नष्ट करण्यासाठी कार्य करतो. नाकपुड्यांच्या श्लेष्मल त्वचेवर फवारणी केल्यावर, नायट्रिक ऑक्साईड व्हायरसला फुफ्फुसात पोहोचण्यापासून प्रतिबंधित करते. हा नेझल स्प्रे COVID-19 साठी एक प्रभावी आणि सुरक्षित अँटीव्हायरल उपचार म्हणून समोर येऊ शकतो. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे मुख्य व्यावसायिक अधिकारी रॉबर्ट क्रॉकार्ट म्हणाले, “आम्हाला खात्री आहे की, यामुळे रुग्णांना अत्यंत आवश्यक आणि वेळेवर वैद्यकीय पर्याय मिळेल.” हे वाचा - Liver Healthy: लिवर खराब होणं म्हणजे संपलं..! निरोगी आरोग्यासाठी आधीपासूनच अशी घ्या काळजी महामारी विरुद्धच्या लढ्यात प्रभावी वेगवेगळ्या चाचण्यांद्वारे स्प्रेचे सूक्ष्मजीव गुणधर्म तपासून पाहिले गेले आहेत. त्यातून असं दिसून आलंय की, जेव्हा हा स्प्रे नाकपुड्यांच्या श्लेष्मावर फवारला जातो, तेव्हा त्यामुळे शरीरात विषाणूचा फैलाव होण्यापासून प्रतिबंधित होतो. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे सीईओ रॉबर्ट क्रॉकार्ट म्हणाले की, कोविड महामारीविरुद्धच्या लढाईत कंपनी म्हणून आम्ही भारतासोबत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. हा स्प्रे SaNOtize सोबत भारतात लॉन्च करत असल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.