मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Coronavirus Fourth Wave: देशात Corona ची चौथी लाट सुरू झाली? सर्व्हेतून समोर आला मोठा रिपोर्ट

Coronavirus Fourth Wave: देशात Corona ची चौथी लाट सुरू झाली? सर्व्हेतून समोर आला मोठा रिपोर्ट

Corona Virus In India: भारतातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णांनी सर्वांनाच चिंतेत टाकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितलं की, धोका अद्याप संपलेला नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 28 एप्रिल: Coronavirus Fourth Wave: भारतातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णांनी सर्वांनाच चिंतेत टाकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितलं की, धोका अद्याप संपलेला नाही आणि सर्वांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. दरम्यान एक सर्वेक्षण अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये कोरोनाची चौथी लाट (Coronavirus Fourth Wave)आणि देशातील तज्ज्ञांवरील लोकांचा विश्वास याबद्दल सांगण्यात आलं आहे.

3 पैकी 1 भारतीयांना चौथ्या लाटेबाबत विश्वास

एका सर्वेक्षणात असा प्रश्न विचारण्यात आला होता की, जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू झाली असून दिल्ली-एनसीआरमध्ये कोविडची प्रकरणे (Coronavirus)सातत्याने वाढत आहेत. हे सर्व लक्षात घेता, भारतात कोरोनाची चौथी लाट कधी येईल, असे लोकांना काय वाटते? सुमारे 11,563 लोकांनी या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे.

एप्रिलमध्ये चौथी लाट सुरू झाली का?

त्यापैकी 29% लोकांना असं वाटतं की, 2022 मध्ये कोविडची चौथी लाट (Coronavirus Fourth Wave)येणार नाही. त्याच वेळी, 4% लोकांनी सांगितलं की पुढील 6 महिन्यांत कोविडची चौथी लाट येणार नाही. तर 34% लोकांना असं वाटत आहे एप्रिलमध्ये चौथी लाट सुरू झाली आहे. एकूणच, असे म्हणता येईल की सर्वेक्षण केलेल्या 3 पैकी 1 भारतीयांना वाटतं की कोविड-19 ची चौथी लाट सुरू झाली आहे.

55% लोकांचा भारतीय तज्ज्ञांवर विश्वास

सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आलं की, सध्या जगभरात कोविडचे 5-7 व्हेरिएंट आहेत. अशा परिस्थितीत, जेव्हा कोरोनाची चौथी लाट येते तेव्हा ते परिस्थिती हाताळू शकतील यावर त्यांना भारतातील तज्ज्ञांवर किती विश्वास आहे? 12,609 लोकांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. 55% लोकांनी सांगितलं की त्यांचा भारतातील तज्ज्ञांवर पूर्ण विश्वास आहे. 29% लोक म्हणाले की, काही प्रमाणात विश्वास आहे. तर 8% लोक असे मानतात की भारतीय तज्ज्ञ चौथ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम नाहीत.

दररोज स्टेटस अपडेट करण्याची मागणी

सर्वेक्षणात सामील असलेल्या लोकांना विचारण्यात आलं की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व जिल्ह्यांना दररोज कोविड प्रकरणांची संख्या नोंदवणे बंधनकारक करावे का? यावर, सर्वेक्षण केलेल्या 12064 लोकांपैकी 83% लोकांनी होय असे उत्तर दिले. ते म्हणाले की, आरोग्य मंत्रालयानं प्रत्येक जिल्ह्यांसाठी हे बंधनकारक करावं.

लोकल सर्किलच्या या सर्वेक्षणात भारतातील 341 जिल्ह्यांतील 36,000 लोक सहभागी झाले होते. 41% लोकं मेट्रो किंवा टियर-1 जिल्ह्यांतील होते. त्याच वेळी, 33% लोक टियर 2 जिल्ह्यांतील आणि 26% लोक टियर 3 आणि टियर 4 किंवा ग्रामीण जिल्ह्यांतील होते.

First published:

Tags: Corona vaccination, Corona virus in india, Coronavirus, Coronavirus cases