जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / मृत्यूपासून वाचवण्यासाठी लसीचा पहिला डोस 82 टक्के, तर दुसरा 95 टक्के प्रभावी : अभ्यासातील निष्कर्ष

मृत्यूपासून वाचवण्यासाठी लसीचा पहिला डोस 82 टक्के, तर दुसरा 95 टक्के प्रभावी : अभ्यासातील निष्कर्ष

मृत्यूपासून वाचवण्यासाठी लसीचा पहिला डोस 82 टक्के, तर दुसरा 95 टक्के प्रभावी : अभ्यासातील निष्कर्ष

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियालॉजीच्या (ICMR-NIE) अभ्यासावरूनही लस हाच प्रभावी उपाय असल्याचं स्पष्ट झालं आहे.

    नवी दिल्ली, 23 जून: कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) होणारे मृत्यू रोखण्यासाठी लस (Vaccine) हाच एकमेव अत्यंत प्रभावी उपाय आहे. त्यामुळं जगभरात लसीकरणावर भर देण्यात येत आहे. भारतातही लसीकरण मोहीम वेगात राबवण्यात येत असून एकाच दिवसात तब्बल 86 लाख लोकांना लस देण्याचा विक्रम नुकताच नोंदवण्यात आला आहे. जितक्या लवकर सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल, तितक्या लवकर कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या विळख्यातून सुटका होईल. याच पार्श्वभूमीवर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियालॉजीच्या (ICMR-NIE) अभ्यासावरूनही लस हाच प्रभावी उपाय असल्याचं स्पष्ट झालं आहे. या अभ्यासानंतर, लसीचा एक डोस मृत्यूपासून वाचवण्यासाठी 82 टक्के प्रभावी आहे. तर दोन्ही डोस मृत्यूपासून 95 टक्के वाचवू शकतात, असा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. तमिळनाडू पोलिस विभाग (Tamilnadu) आपल्या जवानांचे लसीकरण, दुसऱ्या लाटेदरम्यान झालेले मृत्यू आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलेले रुग्ण याबाबत माहिती गोळा करीत आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, आयसीएमआर-एनआयईचे संचालक डॉ. मनोज मुर्हेकर म्हणाले की, लसीकरण झालेल्या आणि न झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे कोविडमुळे झालेले मृत्यू याचा अभ्यास करण्यासाठी हा डेटा वापरला गेला. तामिळनाडू पोलीस विभागात 1 लाख 17 हजार 524 पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. 1 फेब्रुवारी ते 14 मे दरम्यान 32 हजार 792 पोलिसांना पहिला डोस मिळाला होता. तर दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या 67 हजार 673 होती. 17 हजार 59 पोलिसांना एकही डोस मिळालेला नव्हता. यानंतर 13 एप्रिल ते 14 मे 2021 या कालावधीत कोविडमुळे 31 पोलिसांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार जणांना दोन्ही डोस मिळाले होते. तर सात जणांना एक डोस मिळाला होता. उर्वरीत वीस जणांना एकही डोस मिळालेला नव्हता. कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीशी संबंधित मृत्यूच्या जोखमीचा अंदाज लावण्यासाठी लस मिळालेले आणि लस न मिळालेले अशा लोकांच्या मृत्यूच्या आकडेवारीची तुलना करण्यात आली, अशी माहिती संशोधकांनी दिली. हेही वाचा-  धोका वाढतोय; भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचं थैमान, रुग्णांचा आकडा वाढताच 21 जून रोजी ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’मध्ये (Indian Journal of Medical Research) तमिळनाडुमधील उच्च जोखमीच्या गटांमधील मृत्यू रोखण्यासाठी कोविड-19 लसीचा प्रभावीपणा तपासण्यासंदर्भातील हा अभ्यास अहवाल प्रकाशित करण्यात आला. लस प्रभावी असल्याचा या अभ्यासाचा निष्कर्ष : नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 94 टक्के लोकांना कोरोना संसर्गामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज भासली नाही.  तर 77 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची देखील गरज पडली नव्हती. दोन्ही डोस घेतल्यानं रुग्णालयात दाखल करणे, ऑक्सिजन थेरपीची आवश्यकता आणि आयसीयूमध्ये दाखल करण्याची आवश्यकता खूपच कमी होते, असं या अभ्यासातून सिद्ध झालं आहे. या अभ्यासाचे लेखक डॉ. जेव्ही पीटर्स यांच्या मते, पहिल्या डोसपासूनच कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळण्यास सुरुवात होते. लसीचा एक डोस आयसीयूमध्ये दाखल होण्यापासून 95 टक्के संरक्षण देतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात