Home /News /coronavirus-latest-news /

Corona Virus: भारतातील कोरोनाची तिसरी लाट संपलीय का? केंद्र सरकारनं अहवाल केला जाहीर

Corona Virus: भारतातील कोरोनाची तिसरी लाट संपलीय का? केंद्र सरकारनं अहवाल केला जाहीर

सध्याच्या स्थितीत अद्यापही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असले तरीही आमची याला लाट किंवा सर्वोच्च बिंदू म्हणण्याची इच्छा नाही, असं ते म्हणाले. अजूनही काही ठिकाणं आहेत, जिथे संसर्गाची प्रकरणं वेगानं समोर येत आहेत.

    नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी : कोरोना विषाणूच्या (corona virus) नवीन प्रकार ओमिक्रॉनमुळं (Corona Omicron Variant), भारतात कोरोना संसर्गामध्ये अचानक वाढ झाली होती. परंतु, आता संसर्गापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, तरीही परिस्थिती चिंताजनक आहे. गुरुवारी सरकारनं कोरोना संसर्गाबाबत मोठी माहिती दिली. सरकारनं म्हटलंय की, कोविड-19 संसर्गाची तिसरी लाट कोविडच्या डेल्टा प्रकारामुळं उद्भवलेल्या दुसऱ्या लहरीपेक्षा किंचित कमी प्राणघातक आहे. सरकारनं सांगितलं की, दुसऱ्या लाटेनं देशातील लाखो लोकांचा बळी घेतला. परंतु, ओमिक्रॉनच्या तिसऱ्या लाटेत परिस्थिती इतकी गंभीर झाली नाही. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, जेव्हा दुसरी लाट सर्वोच्च बिंदूवर होती, तेव्हा भारतातील दररोज सापडणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 4.5 लाखांच्या पुढे गेली होती. पण आता तिसऱ्या लाटेत संसर्गाची प्रकरणं कमी होताना दिसत आहेत. आरोग्य सचिवांनी सांगितलं की, 24 तासांत देशात 1.72 लाख लोकांना कोविडची लागण झाल्याचं आढळलंय. हे 21 जानेवारीला आढळलेल्या प्रकरणांच्या निम्मं आहे. अग्रवाल म्हणाले की, कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळं सध्याच्या स्थितीत अद्यापही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असले तरीही आमची याला लाट किंवा सर्वोच्च बिंदू म्हणण्याची इच्छा नाही, असं ते म्हणाले. अजूनही काही ठिकाणं आहेत, जिथे संसर्गाची प्रकरणं वेगानं समोर येत आहेत. ते म्हणाले की, अजूनही कोविड प्रोटोकॉलची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. कारण संक्रमणांची संख्या अजूनही जास्त आहे. हे वाचा - कडवट/आंबट ढेकरांनी सगळा दिवस जातोय खराब; हे सोपे उपाय झटपट त्रास करतील कमी संयुक्त आरोग्य सचिव अग्रवाल सांगितलं की, 21 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या दोन आठवड्यात दररोज आढळलेल्या कोविडच्या रुग्णांची संख्या 3,47,254 वरून 50 टक्क्यांनी कमी होऊन 1,72,433 वर आली आहेत. या दोन आठवड्यांदरम्यान पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचं प्रमाण 100 चाचण्यांमागे 39 वरून 10.99 पर्यंत कमी झालंय. याचाच अर्थ, रोज सापडणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट आणि संसर्गाचा प्रसार कमी झाल्याचं दिसत आहे. हे वाचा - कडवट/आंबट ढेकरांनी सगळा दिवस जातोय खराब; हे सोपे उपाय झटपट त्रास करतील कमी लव अग्रवाल म्हणाले की, देशात अजूनही 8 राज्यं आहेत, जिथं 50 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणं आहेत. 12 राज्यांमध्ये 10-50 हजार सक्रिय प्रकरणं आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केरळमध्ये सध्या सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. मंत्रालयानं सांगितलं की, आतापर्यंत लसीचे सुमारे 167.88 कोटी डोस देण्यात आले आहेत. तर, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येपैकी 96 टक्के लोकांना लसीकरण करण्यात आलंय. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील सुमारे 76 टक्के लोकसंख्येला दुसरा डोस मिळाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona updates, Omicron

    पुढील बातम्या