मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोना पॉझिटिव्ह की नेगेटिव्ह; फक्त 50 सेकंदातच CORONA चं निदान होणार

कोरोना पॉझिटिव्ह की नेगेटिव्ह; फक्त 50 सेकंदातच CORONA चं निदान होणार

इज्रायलने तयार केलेलं टेस्टिंग किट (corona testing kit) लवकरच भारतातही तयार केलं जाणार आहे.

इज्रायलने तयार केलेलं टेस्टिंग किट (corona testing kit) लवकरच भारतातही तयार केलं जाणार आहे.

इज्रायलने तयार केलेलं टेस्टिंग किट (corona testing kit) लवकरच भारतातही तयार केलं जाणार आहे.

  • Published by:  Priya Lad

अनुप कुमार मिश्र/नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : भारतात कोरोनाव्हायरसची चाचणी (Coronavirus test) करण्यासाठी सध्या आरटी-पीसीआर टेस्ट आणि अँटिजेन टेस्ट केली जाते आहे. मात्र याचा रिपोर्ट यायला काही वेळ लागतो. आता अवघ्या 50 सेकंदातच कोरोनाचं निदान करता येणार आहे. इज्रायलने (Israel)तयार केलेल्या कोरोना टेस्टिंग किटचं (Corona Testing Kit) भारतात यशस्वी ट्रायल झालं आहे आणि लवकरच भारतात हे टेस्ट किट तयार केलं जाणार आहे.

इज्राइली तंत्रज्ञानानुसार (Israeli Technology) तयार करण्यात आलेल्या कोरोना टेस्टिंग किटचं दिल्लीतील तीन रुग्णालयात ट्रायल सुरू आहे. यामध्ये एलएनजेपी हॉस्पिटल, आरएमएल हॉस्पिटल आणि सर गंगाराम हॉस्पिटलचा समावेश आहे. हजारो रुग्णांवर या टेस्ट किटचं ट्रायल यशस्वी झालं आहे.

एनलएनजेपी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितलं, "गेल्या एका आठवड्यात या किटमार्फत 1000 पेक्षा अधिक रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली. या सर्व रुग्णांचा रिपोर्ट 50 सेंकदात मिळाला. एलएनजेपी आणि आरएमएल हॉस्पिटलमध्येही जवळपास इतक्याच रुग्णांवर या नव्या किटने कोरोना टेस्ट करण्यात आली"

हे वाचा - Plasma Therapy ने पदरी निराशाच पाडली; AIIMS ने दिली महत्त्वाची माहिती

हे किट तयार करणारे इज्रायलचे शास्त्रज्ञ मोशे गेलन यांनी सांगितलं, "किटमार्फत मिळणारा रिझल्ट जवळपास 97 टक्के अचूक आहे. या किटची टेस्टिंग पद्धत अँटिजेन आणि आरटी-पीसीआर टेस्टपेक्षा वेगळी आहे. आरटी-पीसीआर किटमार्फत कोरोनाचा रिपोर्ट यायला चार ते बारा तासांचा कालावधी लागतो. मात्र पूर्ण अचूकतेसह या किटमार्फत फक्त 50 सेकंदातच रिपोर्ट मिळू शकतो. हे किट लाळेमार्फत कोरोनाचं निदान करतं"

डेड व्हायरसचंही होऊ शकतं निदान

मोशे गेलन यांनी सांगितलं, "भारतात सध्या कोरोनाची दोनप्रकारे टेस्टिंग केली जाते. एक म्हणजे आरटी-पीसीआर आणि दुसरं म्हणजे अँटिजेन रॅपिड टेस्टिंग सिस्टम. आरटी-पीसीआर सिस्टममार्फत रुग्णाच्या शरीरात कोरोनाचा निष्क्रिय व्हायरस आहे की सक्रिय व्हायरस याची माहिती करणं कठीण आहे. अनेकदा डेड व्हायरस असल्यासही आरटी-पीसीआर टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो, असा दावाही त्यांनी केला आहे. मात्र या नव्या किटमुळे फक्त मृत व्हायरसचीही माहिती मिळू शकते. इतकंच नव्हे तर व्हायरस किती वेगानं पसरतो आहे हेदेखील समजू शकतं"

हे वाचा - कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी काविळीचं औषध सक्षम ठरेल; भारतातील तज्ज्ञांचा दावा

लवकरच भारतातही हे कोरोना टेस्टिंग किट तयार केलं जाणार आहे. कोर लॉजिक्स कन्सल्टिंग इंडियाचे संचालक अमित शर्मा यांनी सांगितलं, देशातील कोरोना संक्रमणाची सध्याची परिस्थिती पाहता लवकरच भारतातही हे कोरोना किट तयार केलं जाणार आहे. इज्राइलच्या तंत्रज्ञानानुसारच भारतात हे किट भारतात बनवलं जाईल.

First published:

Tags: Coronavirus