मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /24 तासांत कोरोनाचे दुप्पट रुग्ण, H3N2 चे 2 बळी; महाराष्ट्रात पुन्हा महासाथीचं संकट? डॉक्टर म्हणाले..

24 तासांत कोरोनाचे दुप्पट रुग्ण, H3N2 चे 2 बळी; महाराष्ट्रात पुन्हा महासाथीचं संकट? डॉक्टर म्हणाले..

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

राज्यात कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढत आहेत. सोबतच H3N2 चे रुग्ण. त्यामुळे राज्यावर दुहेरी संकटानंतर पुन्हा महासाथ येते की काय अशी भीती वाटू लागली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 15 मार्च :  कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे.  राज्यात 24 तासांत कोरोनाचे दुप्पट रुग्ण, त्यात H3N2 चे रुग्ण आणि त्यांचा मृत्यू... यामुळे पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील या दुहेरी संकटामुळे राज्यात पुन्हा महासाथ येते आहे की काय अशी भीती निर्माण झाली आहे. पुन्हा आजारांचं थैमान, पुन्हा निर्बंध, पुन्हा मास्क... ज्यातून आता कुठे मोकळा श्वास घ्यायला मिळतो आहे, हाच श्वास आता पुन्हा कोंडणार की काय, असं वाटू लागलं आहे.

मंगळवारी राज्यात 155 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी 61 रुग्ण होते. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी म्हणजे 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. पुण्यात सर्वाधिक 75 रुग्ण आहेत. मुंबईत 49, नाशिकमध्ये 13, नागपुरात 8, कोल्हापुरात 5, औरंगाबाद-अकोल्यात प्रत्येकी 2 आणि लातूरमध्ये एक रुग्ण आहे. तर पुण्यातील 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनासोबतच राज्यात H3N2 चे रुग्णही आढळून आले आहेत. पुण्यात H3N2 चे 22 रुग्ण आहेत. तर नागपूर, अहमदनगरमध्ये प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. नागपुरात H3N2 व्हायरसची लागण झालेल्या एका 78 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेहासह इतर उच्चरक्तदाबाचा त्रास होता. या रुग्णाची H3N2 तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आरोग्य विभागाने डेथ ऑडिट झाल्यानंतरच मृत्यूची नोंद H3N2 चा मृत्यू म्हणून करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याआधी अहमदनगरमध्ये H3N2 व्हायरससह कोरोनाची लागण झालेल्या एका मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

कोरोनानंतर आता H3N2 चं थैमान! 90 रुग्ण, 2 बळी; काय आहेत लक्षणं आणि बचावाचा उपाय?

त्यामुळे कोरोनाचे पुन्हा वाढणारे केसेस आणि H3N2 यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? असा प्रश्नही उपस्थित होतो आहे. याबाबत महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, "कोरोना आणि H3N2 हे दोन्ही श्वसनसंबंधी आजार आहेत, इतकंच त्यांच्यात साम्य आहे. पण तसा त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. ते वेगवेगळ्या फॅमिलीतील आहेत"

डॉ. भोंडवे यांनी सांगितलं, "कोरोनाच्या केसेस वाढल्या असल्या तरी तसा आता काही धोका नाही. आताचा विषाणू अजिबात धोकादायक नाही. तर कोरोना असो वा  H3N2  व H1N1, अॅडनोव्हायरस आहेत, हे सर्व रेस्पिरेटरी व्हायरस आहेत. या व्हायरसची प्रकरणं म्हणजे तापमानाचा परिणाम आहे. म्हणजे सध्या दिवसा आणि रात्रीचं कमाल-किमान तापमान यात खूप तफावत आहे. ज्यामुळे श्वसनसंबंधी व्हायरस वाढत आहेत. तापमान नियंत्रणात आलं की या आजारांचं प्रमाणही कमी होईल"

"त्यामुळे कोरोना असो वा H3N2 सारखे रेस्पिरेटरी व्हायरस यांना घाबरण्याची गरज नाही", असंही डॉ. भोंडवे म्हणाले.

H3N2 पासून कसा बचाव करावा? IMA च्या माजी अध्यक्षांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video

पण धोका नसला तरी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मास्कचा वापर, गर्दीत जाणं टाळणं, सोशल डिस्टन्सिंग असे कोरोना काळात पाळलेल्या नियमांचं तुम्ही आताही पालन केलं तर ते तुमच्याच फायद्याचं ठरेल.

First published:
top videos

    Tags: Corona, Coronavirus, H3N2 Virus, Health, Lifestyle, Virus