नवी दिल्ली, 13 जुलै : भारतात कोरोनाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेचं संकट घोंघावत आहे. त्यामुळे आता मोदी सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. मोदी सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. देशात आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना लशीचा बुस्टर डोस म्हणजेच प्रिकॉशन डोस फ्री दिला जाणार आहे, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे (Corona Booster free for 18+).
सध्या भारतात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 पेक्षा जास्त वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत बुस्टर डोस दिला जात आहे. यांना सरकारी लसीकरण केंद्रावर हे डोस उपलब्ध आहेत. तर 18-59 वयोगटातील नागरिकांसाठी खासगी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस दिले जात आहेत. ज्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागत आहेत. पण आता या वयोगटातील नागरिकांनाही बुस्टर डोससाठी पैसे मोजण्याची गरज नाही. 15 जुलैपासून 18+ सर्वांना मोफत बुस्टर डोस मिळेल.
हे वाचा - कोरोनापेक्षाही खतरनाक Marburg Virus चे संशयित रुग्ण आढळले; WHO कडूनही Alert
15 जुलैपासून 75 दिवस बुस्टर डोसची विशेष मोहीम चालवली जाणार जाईल. या दिवसामध्ये 18+ सर्वांना खासगी लसीकरण केंद्रावर कोरोना लशीचा तिसरा म्हणजे बुस्टर डोस दिला जाईल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
People in 18-59 age group will get free precaution doses of Covid vaccine at government vaccination centres under 75-day special drive likely to begin from July 15: Official sources
— Press Trust of India (@PTI_News) July 13, 2022
तज्ज्ञांच्या मते, कोरोना लशीच्या दुसऱ्या डोसनंतर शरीरात तयार झालेली इम्युनिटी काही महिन्यांनंतर कमी होते. त्यामुळे ही इम्युनिटी पुन्हा तयार करण्यासाठी तिसऱ्या डोसची गरज असते. कित्येक देशांमध्ये हा डोस बूस्टर डोस म्हणून दिला जातो. भारतात याला ‘बूस्टर डोस’ न म्हणता ‘प्रिकॉशन डोस’, म्हणजेच खबरदारीचा डोस म्हटलं जात आहे.
हे वाचा - कोरोनापाठोपाठ पुण्यातील Serum Institute च्या Cervical cancer vaccine ला मंजुरी; पहिलीच भारतीय लस
भारतात आतापर्यंत दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनी हा डोस दिला जात होता. पण आता दुसरा डोस आणि प्रिकॉशन डोसमधील गॅप कमी करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रिकॉशन डोससाठी अंतर आता 9 महिन्यांवरून 6 महिने केलं आहे. म्हणजे कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर आता 9 ऐवजी 6 महिन्यांनी तुम्हाला हा प्रिकॉशन डोस घेता येणार आहे. त्यामुळे तिसऱ्या डोससाठी 9 महिने लांबलचक प्रतीक्षा आता थोडी कमी झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus, Health, Lifestyle