बीजिंग, 22 जानेवारी : कोरोना संसर्गामुळे चीनची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. चीनमध्ये एका आठवड्यात 13 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. चीनच्या महामारीशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की सुमारे 80 टक्के चीनी नागरिक आधीच विषाणूच्या विळख्यात आले आहेत, त्यामुळे नजीकच्या भविष्यात दुसरी लाट येण्याची शक्यता नाही. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने रविवारी सांगितले की, 13 ते 19 जानेवारी या सात दिवसांत रुग्णालयांमध्ये कोविड-19 मुळे मृतांची संख्या 12,658 वर पोहोचली आहे. झिरो कोविड पॉलिसी अचानक मागे घेतलल्यानंतर 8 डिसेंबर ते 12 जानेवारी दरम्यान चीनमध्ये सुमारे 60,000 मृत्यू झाले.
सीडीसीचे मुख्य महामारीशास्त्रज्ञ वू झुयू यांनी पुढील काही महिन्यांत दुसर्या लाटेचा संभाव्य धोका नाकारला आहे, तर वृद्ध आणि असुरक्षित लोकांना चंद्र नववर्षादरम्यान सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वू यांनी शनिवारी चिनी सोशल मीडिया साइट वीबोवर लिहिले, "चीनी नववर्षादरम्यान लोकांच्या मोठ्या प्रमाणात प्रवासामुळे काही प्रमाणात साथीच्या रोगाचा प्रसार वाढू शकतो आणि काही भागात संक्रमित लोकांची संख्या वाढू शकते." वू म्हणाले की नवीन लाटेने देशातील सुमारे 80 टक्के लोकांना संक्रमित केले आहे, येत्या दोन ते तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात उद्रेक किंवा दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे.
वाचा - हे तुमच्यासोबतही घडू शकतं! जीवन-मृत्यूमधील 'ती' 10 मिनिटं; थरकाप उडवणारा VIDEO
चीनमध्ये जनजीवन सामान्य असले तरी धोका टळला नाही
गेल्या महिन्यात कोणतीही तयारी न करता चीनने कोविडशी संबंधित सर्व नियम रद्द केले होते. तेव्हापासून चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. अधिकाऱ्यांनी कोविड मृत्यूची व्याख्या कमी केल्याने अधिकृत मृतांच्या संख्येवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. नवीन प्रकरणांच्या सुरुवातीच्या लाटेपासून, चीनच्या बहुतेक भागांमध्ये जीवन मोठ्या प्रमाणात सामान्य झाले आहे. 'चंद्र नववर्षा'च्या निमित्ताने मोठ्या संख्येने यात्रेकरू प्रवास करत असल्याने ग्रामीण भागात विषाणूचा आणखी प्रसार होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
चीनचे शून्य कोविड धोरण काय आहे?
“झिरो कोविड” रणनीती संसर्गाच्या प्रत्येक प्रकरणाचा शोध घेण्यावर आणि त्यांना अलग ठेवण्यावर भर देते. तसेच कोणत्याही स्वरूपात संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांना अलग ठेवणे अनिवार्य करण्यात आले होते. या धोरणामुळे शांघायसारख्या शहरांतील लाखो लोक दोन महिने किंवा त्याहून अधिक काळ त्यांच्या घरात एकटे राहिले आणि त्यांच्यापैकी बर्याच जणांना अन्नाची कमतरता आणि आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याचा सामना करावा लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Corona updates