कोरोनाव्हायरस नियंत्रणात आला असला तरी त्याची दहशत अद्याप संपली नाही नाही. नव्या कोरोनाचा उद्रेक झाला आहे. व्हायरस पसरण्याचा धोका लक्षात घेत प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत.
चिनी प्रशासनाने 12 शहरात 1000 पेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद केली आहे. 2020 साली जेव्हा कोरोनाचा उद्रेक झाला त्यानंतर दोन वर्षांनी एकाच दिवसातील नव्या रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार 1000 पैकी 98 प्रकरणं जिलिन प्रांतातील आहेत. या प्रांतातील औद्यागिक केंद्र असलेल्या चांगचुन शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
चांगचुनमधील नागरिकांना कोणत्याही महत्त्वाच्या कारणाशिवाय घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 90 लाख लोकसंख्या असेलल्या या शहरातील इतके लोक घरात बंदिस्त झाले आहेत.