मास्क न घातला सेल्फी काढणं पडलं महागात, या देशाच्या राष्ट्रपतींना भरावा लागला 2.57 लाखांचा दंड

मास्क न घातला सेल्फी काढणं पडलं महागात, या देशाच्या राष्ट्रपतींना भरावा लागला 2.57 लाखांचा दंड

कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी सर्वांसमोर जाहीर माफी मागत दंड भरण्याची वेळ चिलीच्या राष्ट्रपतींवर आली.

  • Share this:

सेंटियागो, 20 डिसेंबर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर काटेकोरपणे करण्याचे आवाहन वारंवार केलं जात आहे. तरीदेखील काही वेळा या गोष्टी विसरल्या जात असल्यानं तिथे प्रशासनाकडून कठोर कारवाई अथवा दंडात्मक कारवाई केली जात असते. असा एका देशाच्या राष्ट्रपतींना तरुणीसोबत सेल्फी घेणं महागात पडलं आहे.

चिली देशाचे राष्ट्रपती सेबेस्टियन पिनेरा (Chilean President Sebastian Pinera) यांना 3500 डॉलर्स म्हणजे जवळपास 2.57 लाख रुपये दंड भरावा लागला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रपतींना दंड भरावा लागला आहे. राष्ट्रपतींनी विना मास्क महिलेसोबत समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी काढला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चिलीच्या आरोग्य विभागानं या व्हायरल फोटोवर प्रश्न उपस्थित केला आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्स दोन्ही या फोटोत न बाळगल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रपतींना दंड लावण्यात आला आहे.

राष्ट्रपती पिनेरा यांचा विना मास्कचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी सर्वांसमोर जाहीर माफी मागत दंड भरण्याची वेळ चिलीच्या राष्ट्रपतींवर आली.

हे वाचा-इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली कोरोनाची लस, पाहा VIDEO

चिली देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांमध्ये दंडाच्या रकमेसोबत कारावासाची देखील शिक्षेचं देखील प्रावधान करण्यात आलं आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रपतींनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या घरातून समुद्रावर एकटे फिरायला गेले असताना अचानक एका महिलेनं त्यांच्याजवळ येऊन सेल्फी घेतला. ही महिला फोटोसाठी खूप आग्रह करत होती. या महिलेनं केलेल्या मागणीला विरोध करणं अवघड झालं आणि त्यामुळे सेल्फी घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र हा फोटो व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रपतींनी मास्क घातला नाही त्यामुळे त्यांना दंड भरावा लागल्याचं माहिती मिळाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 20, 2020, 12:21 PM IST

ताज्या बातम्या