Home /News /coronavirus-latest-news /

Corona संसर्गातून बरे झाल्यानंतर ताबडतोब बदला या गोष्टी, नाहीतर पुन्हा सापडाल तडाख्यात

Corona संसर्गातून बरे झाल्यानंतर ताबडतोब बदला या गोष्टी, नाहीतर पुन्हा सापडाल तडाख्यात

corona

corona

कोरोनातून बरं (After corona recover) झाल्यानंतर आपल्याला काही सवयी बदलण्याची गरज असते. अन्यथा त्यामुळे पुन्हा संसर्ग (Corona Infection) होण्याचा धोका असतो.

    नवी दिल्ली, 24 जानेवारी : देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या वाढत आहे. या वेळी या विषाणूच्या Omicron प्रकाराचा धोका सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गामधून बरं झालेल्या लोकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. कोरोनातून बरं (After corona recover) झाल्यानंतर आपल्याला काही सवयी बदलण्याची गरज असते. अन्यथा त्यामुळे पुन्हा संसर्ग (Corona Infection) होण्याचा धोका असतो. जाणून घेऊ कोरोना संसर्गामधून बरं झाल्यानंतर आपण काय बदललं पाहिजे. टूथब्रशचा (Toothbrush) पुन्हा वापर करू नका सर्वप्रथम, कोरोना संसर्गामधून बरं झालेल्या रुग्णानं आपला टूथब्रश (Change Toothbrush) बदलावा. कारण, संक्रमणादरम्यान वापरलेला टूथब्रश पुन्हा वापरणं योग्य नाही. झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, आपण आपला टूथब्रश वेळोवेळी बदलत राहिला पाहिजे. असं मानले जातं की, हा विषाणू प्लास्टिकच्या पृष्ठभागावर दीर्घकाळ टिकू शकतो. म्हणूनच सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही जुन्या टूथब्रशला कायमची सुट्टी द्यावी. असं केल्यानं तुम्ही पुन्हा संसर्ग होण्याचं टाळू शकता. हे वाचा - तुमचं मूलही खाताना चिडचिड करतंय का? हा Corona effect; संशोधकांनी केलं Alert टंग क्लिनरसह या वस्तूंचा वापर पुन्हा करू नका टूथब्रशव्यतिरिक्त, संसर्ग टाळण्यासाठी तुमचा टंग क्लीनरही फेकून द्या. तसंच जुना टॉवेल, रुमाल इत्यादी वापरू नका किंवा वापरायचे असल्यास ते निर्जंतुक करून वापरा. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही स्वतःला पुन्हा संसर्ग होण्यापासून वाचवू शकता. हे वाचा - ही आहेत Omicron ची सर्व 14 लक्षणं; सर्वात कमी आणि सर्वात जास्त वेळा दिसलेले Symptoms दात व्यवस्थित घासणं कोरोना संसर्गातून बरं झाल्यानंतर दात घासण्यापूर्वी हात चांगले धुवा. याशिवाय दिवसातून दोनदा ब्रश करा आणि जीभ स्वच्छ करा. असं केल्यानं, संसर्गाचा प्रसार (Corona Infection) रोखला जातो आणि तुम्ही सुरक्षित राहता. तसंच, आपल्या आहारातून हिरव्या भाज्यांचं नियमित सेवन करत रहा. मास्क लावायला विसरू नका. कारण, जे लोक संसर्गापासून बरे झाले आहेत, त्यांना स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Corona vaccination, Coronavirus

    पुढील बातम्या