मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Omicron XE Variant Symptoms: Omicron XE व्हेरिएंटमुळे भारतावर Corona च्या चौथ्या लाटेचं सावट?, लहान मुलांना सर्वाधिक धोका

Omicron XE Variant Symptoms: Omicron XE व्हेरिएंटमुळे भारतावर Corona च्या चौथ्या लाटेचं सावट?, लहान मुलांना सर्वाधिक धोका

Corona Virus Update News: कोरोनाच्या चौथ्या लाटेला ओमायक्रॉन XE  (Omicron XE) आणि बीए 2 (BA2 variant) हे दोन व्हेरिएंट कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.

Corona Virus Update News: कोरोनाच्या चौथ्या लाटेला ओमायक्रॉन XE (Omicron XE) आणि बीए 2 (BA2 variant) हे दोन व्हेरिएंट कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.

Corona Virus Update News: कोरोनाच्या चौथ्या लाटेला ओमायक्रॉन XE (Omicron XE) आणि बीए 2 (BA2 variant) हे दोन व्हेरिएंट कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, 21 एप्रिल: जगभरात कोरोना रुग्णांचं प्रमाण सध्या पुन्हा एकदा वाढत आहे. भारतातदेखील ऑगस्टपर्यंत कोरोनाची चौथी लाट (Fourth wave of Covid) धडकू शकते अशी भीती वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेला ओमायक्रॉन XE  (Omicron XE) आणि बीए 2 (BA2 variant) हे दोन व्हेरिएंट कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. कारण हे व्हेरिएंट आतापर्यंतचे सर्वांत जास्त वेगाने प्रसार होणारे व्हेरिएंट आहेत. यातील ओमायक्रॉन XE ची लक्षणं (Omicron XE Symptoms) कोणती आहेत, आणि त्यापासून कशाप्रकारे बचाव करता येईल; याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

किती घातक आहे ओमायक्रॉन XE?

भारतात कोरोनाचा ओमायक्रॉन XE व्हेरिएंट (Omicron XE variant) दाखल झाला आहे. कोरोनाच्या बीए1 आणि बीए2 या दोन व्हेरिएंट्सचे एकत्रित हायब्रिड असे रूप म्हणजे ओमाक्रॉन XE. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पूर्वीच्या व्हेरिएंट्सच्या तुलनेत हा व्हेरिएंट 10 पट अधिक संसर्गजन्य (Omicron XE more transmissible) आहे. त्यामुळेच लसीकरण न झालेल्या लोकांसाठी हा विषाणू मोठ्या प्रमाणात घातक ठरू शकतो. अमर उजालाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

ओमायक्रॉन XE ची लक्षणं

या विषाणूचा संसर्गदर अधिक असल्यामुळे, याला लवकरात लवकर रोखण्याचा प्रयत्न करायला हवा. यासाठी तुम्हाला ओमायक्रॉन XE च्या लक्षणांबाबत (Symptoms of new covid variant) माहिती हवी. जेणेकरून तुम्ही वेळीच डॉक्टरांची भेट घेऊन विषाणूचा पुढील प्रसार रोखू शकता. कोरोनाच्या लक्षणांमध्ये सर्दी-ताप, घशात खवखव, खोकला अशा लक्षणांचा समावेश होता. ओमायक्रॉन XE मध्ये यासोबतच थोड्या थोड्या वेळाने प्रचंड डोकेदुखी, घसा बसणं वा बोलण्यास अडचण येणं, अचानक अंग दुखणं, अस्वस्थता आणि भीती वाटणं, गॅस्ट्रोइंटेस्टीनल डिस्ट्रेस म्हणजे पोटदुखी आणि त्वचेवर जळजळ होणं अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. यातील कोणतंही लक्षण अधिक काळ दिसून येत असल्यास त्वरित डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे.

असा करा बचाव

कोरोनाची चौथी लाट दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेएवढी घातक नसेल, असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. मात्र, लहान मुलांचे लसीकरण अद्याप पूर्ण झाले नसल्यामुळे, त्यांना या लाटेत कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. त्यातच सध्या बऱ्याच शाळांनी ऑफलाईन वर्ग आणि परीक्षा सुरू केले आहेत. अशात मुलांच्या आरोग्यकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी सर्वात आधी मुलांची इन्युनिटी (Precautions for Omicron XE) वाढवण्यावर भर द्यायला हवा. खाण्या-पिण्याची ठराविक वेळ, पुरेसा पौष्टिक आहार आणि पुरेसा व्यायाम अशा सवयी मुलांना लावणे गरजेचे आहे.

सोबतच, तुमचे मूल जर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी (Covid vaccination) पात्र असेल तर लवकरात लवकर त्याचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्कचा वापर कायम ठेवणे अशा गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान, सरकारने 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना बूस्टर डोस (Corona Booster dose) घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे, आवश्यकता भासल्यास तो पर्यायही वापरला जाऊ शकतो.

सुरक्षा दलाला मोठं यश; 12 लाखांचं बक्षीस असलेला दहशतवादी चकमकीत ठार

कित्येक राज्यांनी तिसरी लाट ओसरल्यानंतर मास्क सक्ती मागे घेतली होती. मात्र, केवळ सक्ती नाही म्हणून मास्कचा वापर टाळू नका. आपली सुरक्षा आपल्या हातात आहे हे लक्षात ठेऊन, आणखी काही दिवस मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन स्वतःच करा. या सवयींमुळेच तुम्ही कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेचा सामना करू शकाल.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Coronavirus symptoms, Omicron