मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Omicron update: नाका-तोंडातून कोरोना करतो शरीरात प्रवेश; आयुष मंत्रालयाने सांगितले हे 5 उपाय

Omicron update: नाका-तोंडातून कोरोना करतो शरीरात प्रवेश; आयुष मंत्रालयाने सांगितले हे 5 उपाय

नाक आणि तोंडातून विषाणू येऊ नयेत यासाठी आयुषने काही उपाय सुचवले आहेत. ज्यामध्ये मास्क व्यतिरिक्त, हे पाच प्रतिबंधात्मक उपाय महत्वाचे आहेत. लोक ते घरी देखील सहज करू शकतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 19 डिसेंबर : पुन्हा एकदा कोरोनाचा नवीन विषाणू प्रकार Omicron नं जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकाराचे 100 हून अधिक रुग्ण भारतात आढळले आहेत. हा विषाणू प्रकार डेल्टासारख्या धोकादायक प्रकारांपेक्षा सुमारे 70 पट जास्त संसर्गजन्य आहे. त्यातच दररोज सापडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 हजाराच्या वर गेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारसह शास्त्रज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञही कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना सूचवत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान, लोकांना आयुर्वेदिक उपायांसह उपचारांची माहिती देणाऱ्या आयुष मंत्रालयानं पुन्हा एकदा कोरोना विषाणूसंदर्भात (CoronaVirus) नवीन शिफारशी लागू केल्या आहेत. यामध्ये शरीराच्या कोणत्या भागांद्वारे कोरोना सर्वात जास्त पसरतो, हेही सांगण्यात आलंय.

अलीकडेच, आयुष मंत्रालयानं जारी केलेल्या नवीन शिफारशींमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, कोरोना SARS-CoV-2 विषाणू शरीरात दोन प्रमुख भागांमधून प्रवेश करतो. हे दोन भाग म्हणजे नाक आणि तोंड आहेत. त्यामुळं कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क सर्वात प्रभावी असल्याचं म्हटलं जातंय. मास्क घातल्यानं नाक आणि तोंड दोन्ही झाकले जातात. त्यामुळं धोकादायक विषाणू आत जात नाहीत.

नाक आणि तोंडातून विषाणू येऊ नयेत यासाठी आयुषने काही उपाय सुचवले आहेत. ज्यामध्ये मास्क व्यतिरिक्त, हे पाच प्रतिबंधात्मक उपाय महत्वाचे आहेत. लोक ते घरी देखील सहज करू शकतात.

नाकाची काळजी

आयुषतर्फे सांगण्यात आलंय की, तेलाचे दोन थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये टाकल्यास यामुळं विषाणू नाकातून पुढं सरकणं थांबवण्याचे काम होऊ शकतं. यासाठी तिळाचं तेल, खोबरेल तेल किंवा गाईचं तूप यापैकी कोणतंही एक वापरता येईल. रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही नाकपुड्यांमध्ये तेल टाकावं. हे तेल नाकातून घशात गेल्यास ते आत घेण्याऐवजी लगेच बाहेर थुंकावं.

वाफ

दिवसातून किमान एकदा वाफ घेणं खूप फायदेशीर आहे आणि ते विषाणूचा मार्ग थांबवण्यासाठी प्रभावी आहे. यासाठी पुदिना, तुळस, निर्गुंडी किंवा अजमोरा यांच्या बिया पाण्यात उकळाव्यात आणि नंतर त्याची वाफ घ्यावी.

हे वाचा - डायपरमध्ये लपवले ड्रग्स; थर्टी फस्ट पार्टीच्या तयारीत असलेली मुंबईतील एअर होस्टेस अटकेत

जल नेति किंवा नाक धुणं

जल नेती ही थोडी क्लिष्ट प्रक्रिया आहे. मात्र, तीही करता येते. यासाठी नेतीच्या भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात खडे मीठ किंवा सैंधव टाकावे. ते एका नाकपुडीतून टाकून दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर काढलं जातं. असं दोन ते तीन वेळा करावं.

ऑइल पुलिंग थेरपी/ किंवा तेलाची चूळ धरणं

दोन चमचे खोबरेल किंवा तिळाचं तेल घेऊन ते कोमट करून तोंडात घ्यावं. यानंतर ते तोंडात दोन-तीन वेळा फिरवून बाहेर फेकून द्यावं. हेही विषाणूविरूद्ध कवच तयार करतं.

हे वाचा - राज्यात Omicron रुग्णांची संख्या 50 पार, पुण्यात 5 वर्षांच्या मुलालाही लागण!

माउथ वॉश किंवा गुळण्या करणं

एक चमचा ओवा घ्या आणि 500 ​मिली पाण्यात उकळा. पाणी उकळून अर्धे झाल्यावर या पाण्यानं गुळण्या करा. याशिवाय अडीचशे मिली पाणी गरम करून त्यात थोडी हळद आणि मीठ टाकून गुळण्या कराव्यात. यामुळं विषाणूपासून संरक्षण होईल.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus