मुंबई, 15 जानेवारी : कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार ओमिक्रॉन आल्यानंतर जगभरात पुन्हा एकदा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. देशातही कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसांत लाखोंच्या घरात गेली आहे. परिणामी पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले असून कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगितले जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क खूप महत्त्वाचा आहे, कारण तो व्हायरसला तुमच्या शरीरात प्रवेश करण्यापासून रोखतो. बाजारात विविध प्रकारचे मास्क विकले जात आहेत. परंतु, आरोग्य तज्ज्ञ N95 मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. अशा परिस्थितीत दुकाने आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर अनेक बनावट N95 मास्क विकले जात आहेत.
लोकं ओरिजनल N95 मास्कसाठी पैसे देत आहेत. मात्र, त्या बदल्यात त्यांना अनेकदा बनावट N95 मास्क मिळतात. आता तुम्ही विचार करत असाल की तुम्ही विकत घेतलेला N95 मास्क खरा आहे की खोटा हे कसे ओळखायचे? आम्ही कशासाठी आहोत? चला जाणून घेऊयात.
N95 मास्क काय आहे?
N95 मास्क बाजारात विकल्या जाणार्या इतर मास्कपेक्षा किंचित महाग आहेत. मात्र, तो अधिक प्रभावी आहे. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, N95 अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की शरीरात हवेतील कोणतेही कण प्रवेश करू शकत नाहीत आणि संसर्गाचा प्रसार कमीतकमी होतो.
N95 मास्कमुळे किती संरक्षण मिळते?
N95 हा कोरोना काळातील सर्वोत्तम मास्क मानला जातो. हा तुमच्या तोंडावर आणि नाकावर व्यवस्थित बसतो आणि हवेतील 95% कणांना शरीरात जाण्यापासून रोखतो. म्हणूनच त्याला N95 मास्क म्हणतात. हा मास्क 100% जीवाणू आणि धुळीपासून वाचवतो. कोरोना विषाणूचे कण 0.12 मायक्रॉन व्यासाचे आहेत आणि सीडीसीनुसार, हा मास्क 0.1 ते 0.3 मायक्रॉनच्या कणांना शरीरात जाण्यापासून रोखतो.
बाबो..! 'या' देशात मास्क आणि लसीकरणाची आवश्यकता नाही, सरकारनेच घेतला निर्णय
N95 मास्कचे किती प्रकार आहेत?
N95 मास्कचे चार वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला नियमित N95 मास्क आहे, जो कार्यालयात किंवा दैनंदिन वापरासाठी वापरला जातो. मात्र, एकदा खराब झाल्यानंतर तो पुन्हा वापरता येत नाही. दुसरा धुण्यायोग्य N95 मास्क आहे, जो वापरल्यानंतर धुऊन पुन्हा वापरता येतो. त्याचप्रमाणे, मुलांसाठी तिसरा N95 मास्क येतो, जो धुता येत नाही. चौथ्या क्रमांकावर मुलांसाठी N95 मास्क आहे जो धुण्यायोग्य आहे. तो धुऊन पुन्हा वापरला जाऊ शकतो.
N95 मास्कची किंमत किती आहे?
नियमित N95 मास्कची किंमत 200 ते 300 रुपयांपर्यंत आहे.
धुण्यायोग्य N95 मास्कची किंमत रु. 250 ते रु 450 पर्यंत आहे.
लहान मुलांच्या N95 मास्कची किंमत 150 ते 250 रुपये आहे.
लहान मुलांच्या धुण्यायोग्य N95 मास्कची किंमत 200-350 रुपये आहे.
Dangerous..! Omicron च्या नव्या स्ट्रेनचा कहर; पसरतो वेगानं
मास्क खरा की खोटा कसा ओळखणार?
मास्कवर कोणत्याही अधिकृत कंपनीचा लोगो नसणे.
NIOSH च्या स्पेलिंग चुकीची लिहणे
विविधरंगी फेसपीस किंवा हेडबॅगचा वापर केलेला असणे.
ब्रँडनेम CDC इंडेक्समध्ये चक करू शकता.
ब्रँडनेम आणि ट्रेडमार्क मास्कवर प्रिंट असतो.
ऑनलाईन मास्क खरेदी करताना हिस्ट्री आणि रिव्ह्यू चेक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Face Mask, Mask, Sanitizer and mask