जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / अमरावतीकरांची झोप उडवणारी बातमी! आफ्रिका रिटर्न कोरोना पॉझिटिव्ह महिला मोबाइल बंद करून गायब

अमरावतीकरांची झोप उडवणारी बातमी! आफ्रिका रिटर्न कोरोना पॉझिटिव्ह महिला मोबाइल बंद करून गायब

अमरावतीकरांची झोप उडवणारी बातमी! आफ्रिका रिटर्न कोरोना पॉझिटिव्ह महिला मोबाइल बंद करून गायब

यूके, ब्राझील आणि आफ्रिकेत कोरोनाव्हायरसचा आढळलेल्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण भारतातही आहेत. कोरोनाचे हे नवे रूप अधिक संक्रामक असल्याचं सांगितलं जातं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अमरावती, 16 फेब्रुवारी : मुंबई, पुणे, नागपूरप्रमाणेच अमरावतीतही कोरोना (Amravati Corona Virus) थैमान घालतो आहेत. अमरावतील अचानक कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. जिथं महिनाभरापूर्वी दिवसाला 70 पेक्षाही कमी प्रकरणं येत होती, तिथं रविवारी 430 नव्या प्रकरणांची नोंद झाली. अशात आता आणखी चिंताजनक बातमी म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह महिला गायब झाली आहे. विशेष म्हणजे तिचा फोनही बंद आहे. ही महिला आफ्रिकेहून परतली होती. तिची कोरोना टेस्ट करण्यात आली, ज्यात तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पण नमुने दिल्यानंतर त्या महिलेचा पत्ताच नाही. तिचा फोनही स्विच ऑफ आहे. इंडियन एक्स्प्रेस च्या रिपोर्टनुसार जिल्हा सिव्हील सर्जन डॉ. श्यामसुंदर निकम म्हणाले, “आफ्रिकेहून परतलेल्या एका महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पण ती महिला गायब आहे. आम्ही त्या महिलेला ट्रेस करण्यासाठी पोलिसांची मदत घेतली पण तिनं तिचा फोनही स्विच ऑफ आहे. ती आयसोलेट झाली की नाही हेदेखील आम्हाला माहिती नाही. कोरोना संक्रमण वाढतच आहे” यूके, ब्राझील आणि आफ्रिकेत कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेन आढळलेला आहे. कोरोनाचे हे नवे रूप अधिक संसर्गजन्य असल्याचं सांगितलं जातं आहे आणि आफ्रिकेहून परतलेली ही महिला गायब झाली आहे, त्यात कोरोनाची प्रकरणं अचानक वाढली आहे. त्यामुळे आता प्रशासनाची झोप उडाली आहे. हे वाचा -  मुंबईकरांनो या परिसरात फिरकू नका! पुन्हा पसरतोय कोरोना, हे आहेत नवे Hotspots दरम्यान अमरावतीत कोरोनाची परिस्थिती पाहता प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत.  जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत आहे की नाही, यासाठी विशेष पथकं ठेवण्यात आली आहे. लग्न समारंभात फक्त 50 व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. दहावी आणि बारावी वगळता शाळा बंद ठेवण्यात आल्या आहे. हे वाचा -  …तर पुन्हा लॉकडाऊन करणार लागू; ठाकरे सरकारकडून अलर्ट यूके, ब्राझील आणि आफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण भारतातही आढळलेले आहेत. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार  दक्षिण आफ्रिकेहून परतलेल्या चार जणांमध्ये कोरोनाचा आफ्रिकेतील स्ट्रेन आढळला आहे. तर ब्राझीलमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन असलेला रुग्णही भारतात सापडला आहे. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील कोरोनाचा हा नवा स्ट्रेन ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपेक्षा वेगळा असल्याचंही सांगितलं जातं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात