वॉशिंग्टन, 22 डिसेंबर : कोरोना व्हायरसचा (Coronavirus Pandemic) नवीन प्रकार Omicron वेगाने जगभरात पसरत आहे. आतापर्यंत सुमारे 90 देशांमध्ये या प्रकाराची प्रकरणे आढळून आली आहेत. दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी Omicron प्रकाराबाबत इशारा दिला आहे. गेट्स यांनी संक्रमणाबाबत एकामागून एक सलग 7 ट्विट केले. आपण लवकरच महामारीच्या सर्वात वाईट टप्प्यातून जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आतापासून काळजी घ्यावी लागेल.
बिल गेट्स म्हणाले, 'माझ्या जवळचे मित्र नवीन संसर्गाच्या विळख्यात आलेत, त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. नवीन प्रकाराचा धोका लक्षात घेऊन मी सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याचे माझे सर्व प्लॅन्स रद्द केले आहेत.
बिल गेट्स पुढे म्हणाले की, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ओमिक्रॉन आपल्याला किती धोकादाय आहे हे देखील आपल्याला माहित नाही. डेल्टाच्या तुलनेत तो निम्म्याहूनही प्रभावी मानला, तर ती चिंतेची बाब आहे, कारण तो खूप वेगाने पसरत आहे.
शेवटी, बिल गेट्स म्हणाले की यादरम्यान एक चांगली बातमी अशी आहे की ओमिक्रॉन खूप वेगाने हातपाय पसरत आहे. एखाद्या देशात पसरल्यानंतर, संसर्गाची लाट 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत संपते. ते म्हणाले की जग नेहमीच असे राहणार नाही. एक दिवस महामारी संपेल. जर आपण एकमेकांची काळजी घेतली तर ही वेळ लवकरच येईल.
Just when it seemed like life would return to normal, we could be entering the worst part of the pandemic. Omicron will hit home for all of us. Close friends of mine now have it, and I’ve canceled most of my holiday plans.
— Bill Gates (@BillGates) December 21, 2021
WHO कडून ख्रिसमसचे उत्सव रद्द करण्याचे आवाहन
गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी 39 टक्के अधिक मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. अमेरिकेची स्थिती अशी आहे की आता ओमिक्रॉनने डेल्टाची जागा तिथल्या मुख्य प्रकारात घेतली आहे. त्याचप्रमाणे, डेन्मार्कमध्येही ओमिक्रॉनचे वर्चस्व वाढले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर WHO च्या प्रमुखांनी सर्व देशांना ख्रिसमसचे उत्सव रद्द करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, शोक करण्यापेक्षा उत्सव न केलेला बरा.
नेदरलँड सरकारने ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शाळा, विद्यापीठे, इतर अनावश्यक दुकाने, बार आणि रेस्टॉरंट 14 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. डेन्मार्कमध्येही संग्रहालये बंद करण्यात आली आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि थायलंडकडून खबरदारीच्या उपाययोजना
ऑस्ट्रेलियातही कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. न्यू साउथ वेल्समध्ये पहिल्यांदाच एका दिवसात कोरोनाचे 3000 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यावर बूस्टर डोस आणण्यासाठी दबाव वाढला आहे. त्याचप्रमाणे व्हिक्टोरियामध्ये 1245 नवीन रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनच्या धोक्याच्या दरम्यान, थायलंडने परदेशी प्रवाशांसाठी क्वारंटाईन अनिवार्य करण्याची घोषणा केली आहे. पूर्वी निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवून प्रवेश केला जायचा. मात्र, आता ही योजना बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इस्रायलमध्ये कोरोनाच्या पाचव्या लाटेदरम्यान अमेरिकेतून प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bill gates, Corona, Corona updates