मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /लहान मुलांच्या लसीकरणाविषयी महत्त्वाची बातमी, फायझरची लस लवकरच भारतात उपलब्ध होणार

लहान मुलांच्या लसीकरणाविषयी महत्त्वाची बातमी, फायझरची लस लवकरच भारतात उपलब्ध होणार

अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी फाझर व्हॅक्सीन (Pfizer Vaccine) ही जगातील एकमेव अशी कंपनी आहे, ज्यांची लस मुलांनाही दिली जात आहे. आता ही लस भारतातील मुलांनाही दिली जाणार आहे.

अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी फाझर व्हॅक्सीन (Pfizer Vaccine) ही जगातील एकमेव अशी कंपनी आहे, ज्यांची लस मुलांनाही दिली जात आहे. आता ही लस भारतातील मुलांनाही दिली जाणार आहे.

अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी फाझर व्हॅक्सीन (Pfizer Vaccine) ही जगातील एकमेव अशी कंपनी आहे, ज्यांची लस मुलांनाही दिली जात आहे. आता ही लस भारतातील मुलांनाही दिली जाणार आहे.

नवी दिल्ली, 04 जून : कोरोना विषाणूची दुसरी लाट आता भारतात (Corona Second Wave) थोडी उसंत घेत असल्याचे चित्र आहे. मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त असली तरी रुग्णसंख्या सध्या झपाट्यानं कमी होत आहे. परंतु, ही लाट जोमात असतानाच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती मुलांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारतातील मुलांसाठी कोरोना लसीचा अभाव. अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी फाझर व्हॅक्सीन (Pfizer Vaccine) ही जगातील एकमेव अशी कंपनी आहे. ज्यांची लस मुलांनाही दिली जात आहे. आता ही लस भारतातील मुलांनाही दिली जाणार असल्याचे, दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे. फायझरची लस लवकरच भारतात उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आहे.

फायझर आणि मॉडर्ना या लसींना लवकरच भारतात आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळण्याचे संकेत केंद्र सरकारने बुधवारी दिले आहेत. डॉ. गुलेरिया म्हणाले की, आपल्याकडं चाचणी न करता भारत सरकारनं लसीला ग्रीन सिग्नल देण्याची ही पहिली वेळ नाही. सीएनएन न्यूज 18 शी बोलताना ते म्हणाले की, 'यापूर्वीही अमेरिका, ब्रिटन किंवा ईयू आणि WHO च्या एजन्सींनी मान्यता दिलेल्या सर्व लसींना भारत सरकारने तातडीनं मान्यता दिल्या आहेत. त्याआधारे, या एजन्सींच्या मंजुरीमुळं लसींना तातडीची मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळं लवकरच आपल्याकडे मुले आणि प्रौढांसाठीचीही फायझर लस उपलब्ध असेल.

हे वाचा - 35 वर्षांच्या महिलेने 16 वर्षांच्या मुलाचे केले लैंगिक शोषण; खुलाशानंतर पतीकडून 1 लाखांची मागणी

परदेशी लसीला उशीर का?

फायझर आणि मॉडर्ना यासारख्या लसींना भारतात आणण्यास विलंब का झाला? असा प्रश्न निर्माण झाला. या प्रश्नाच्या उत्तरात गुलेरिया म्हणाले, 'सुरुवातीला डेटाचा अभाव हे यामागील सर्वात मोठे कारण आहे. लस किती सुरक्षित आहे हे केवळ आकडेवारीनंतरच ठरवले जाऊ शकते. युरोपमध्ये या लसीचे काही दुष्परिणाम झाल्याचे वृत्त आहे. अमेरिका आणि ब्रिटनच्या लसीकरणाचे रिझल्ट चांगले आहेत. तेथील आकडेवारीनंतर भारतातही त्याला ग्रीन सिग्नल देण्यात येत आहे. जेव्हा आम्हाला असे वाटले की, ही लस भारतातील लोकांसाठीसुद्धा सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच ती आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Corona updates, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus