Home /News /coronavirus-latest-news /

फक्त एक नव्हे तर समोर आहे हजारो कोरोनाव्हायरसचं संकट

फक्त एक नव्हे तर समोर आहे हजारो कोरोनाव्हायरसचं संकट

तज्ज्ञांच्या मते, प्राण्यांमध्ये जवळपास 30 हजार आयसोलेटेड कोरोनाव्हायरस (coronavirus) असतात.

    मुंबई, 23 एप्रिल : आतापर्यंत जितके रिसर्च झाले त्यानुसार कोरोनाव्हायरस (coronavirus) वटवाघळामार्फत (bats) माणसांपर्यंत पोहोचला, जसा काही वर्षांपूर्वी एबोला पोहोचला होता. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे वटवाघळांचं इकोसिस्टम मानवांनी प्रभावित केलं आहे. त्यामुळे इतर सस्तनांच्या तुलनेत सर्वाधिक व्हायरसला आश्रय देणारे वटवाघूळ थेट मानवी इकोसिस्टमवर हल्ला करू शकते. एका अहवालानुसार प्राण्यांमध्ये (animal) जवळपास 30 हजार आयसोलेटेड कोरोनाव्हायरस (isloated coronavirus) असतात. जर प्राणी किंवा पक्ष्यांमार्फत जर एक-दोन वेळा कोरोनाव्हायरस माणसांसाठी कहर ठरू शकतो तर असं हजारो वेळा होऊ शकतं. 2017 साली सर्वात प्रसिद्ध पुस्तकांपैकी एक Panademic पुस्तकाच्या लेखिका सोनिया शाह यांनी वॉक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव प्रत्येक प्रजातीत असतात. एबोला वटवाघळांच्या शरीरात आजार निर्माण करत नाहीत, कारण हे सूक्ष्मजीव त्यांच्यासाठी अनुकूल असतात. आपलं शरीर या सूक्ष्मजीवांसाठी योग्य नसतं, त्यामुळे आपण आजारी पडतो. तसंच माणसांमार्फतही प्राण्यांपर्यंत कित्येक सूक्ष्मजीव पोहोचतात जे त्यांना आजारी पाडतात. हे वाचा - Coronavirus चा स्रोत समजल्या जाणाऱ्या वटवाघळाची या गावात केली जाते पूजा जंगलांसह आपण प्राणी, पक्षी, कीटकांचं जग झपाट्याने संपवलं आहे. ज्यामुळे त्यांची वेगळी दुनिया आपल्या दुनियेच्या जवळ आली आहे आणि आजार पसरण्याचा धोका वाढला आहे. कन्वर्सेशनच्या रिपोर्टनुसार क्लाइमेट चेंजने आपल्या आरोग्यासाठी धोका निर्माण केला आहे. कोविड-19 सारख्या आजारांचा विचार केल्यास प्रदूषणामुळे धोका अधिक वाढतो. फोर्ब्सच्या एका रिपोर्टनुसार शहरीकरण आणि जंगलाचा नाश याबाबत युरोपियन शास्त्रज्ञांनी 2018 साली एका लेखात उल्लेख केल्यानुसार पर्यावरणीय बदलांमुळे धोके वाढत आहेत. याच लेखात वटवाघळांची इकोसिस्टम बिघडवण्याच्या परिणामांबाबतही इशारा देण्यात आला होता. हे वाचा - निशब्द! लॉकडाऊनमध्ये आसरा घेतलेल्या शाळेला रंग देत मजुरांनी मानले आभार एकंदरच एचआयव्ही, एबोला, झिका, हेंड्रा, सार्स, मार्स बर्ड फ्लू यासारख्या आजारांनंतर आता कोविड 19 ही धोक्याची घंटा आहे आणि आतच सावध होण्याची गरज आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या