गुलशन सिंह, प्रतिनिधी बक्सर, 2 जुलै : एकीकडे जगात प्लास्टिक हा शाप मानला जात आहे. तर दुसरीकडे बिहार राज्यातील बक्सरच्या तरुणासाठी प्लास्टिक वरदान ठरत आहे. ही कथा आहे, संजीत श्रीपति नारायण राय या तरुणाची. तो डुमरांव उपविभागातील ढ़काइच गावातील रहिवासी आहे. परदेशात शिक्षण पूर्ण केले आणि आता सुमारे दोन कोटी रुपये खर्चून त्याने आपल्या मूळ गावी स्वत:चा कारखाना उभारला आहे आणि या माध्यमातून तो 20 जणांना रोजगारही देत आहेत. जाणून घेऊयात, हा तरुण नेमकं काय करतोय. ज्याचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. संजीव सांगतो की, त्यांच्या इथे जागी प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून पाण्याची टाकी बनवली जाते. यासाठी अनेक प्रकारची मशिन्स बसवण्यात आली आहेत. याद्वारे प्रत्येक प्रकारची टाकी अनेक रंगात तयार केली जाते. यामध्ये प्रामुख्याने 500 लिटर, 1000 लिटर, 2000 लिटर, 5000 लिटर क्षमतेच्या टाक्यांचा समावेश आहे.
संजीत याने सांगितले की, सध्या बाजारात डॉल्मेन म्हणजे व्हेल या दोन नावांच्या ब्रॅण्डद्वारे तयार केलेल्या टाक्या विकल्या जात आहेत. त्याला गावाशी खूप ओढ आहे, त्यामुळे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियात मिळालेली नोकरी नाकारली आणि त्यानंतर 2019 मध्ये गावात टाक्या तयार करण्याचा कारखाना सुरू केला. यामाध्यमातून त्याने गावातील व परिसरातील तरुणांना रोजगाराशी जोडून त्यांची आर्थिक प्रगती करायची आहे, असे सांगितले. सुरुवातीला जेव्हा कारखाना सुरू झाला तेव्हा कोरोनाचे संकट होते. त्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम होऊन सुमारे 70 ते 80 लाखांचे नुकसान सहन करावे लागले. मात्र, त्याने हार मानली नाही आणि वडिलांकडून प्रेरणा घेऊन 2021 मध्ये पुन्हा नव्या गुंतवणुकीने कारखाना सुरू केला. यामध्ये पंतप्रधानांनी सुरू केलेल्या पीएमईजीपी योजनेचा आधार घेण्यात आला आहे. तर एका टाकीवर 20 टक्के मार्जिन उपलब्ध असून एकंदरीत महिन्याभरात 20 ते 25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे त्याने सांगितले. तर स्थानिक बाजारपेठे व्यतिरिक्त, येथे बनविलेले पदार्थ उत्तर प्रदेश, झारखंडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुरवले जातात. संजीत राय या तरुणाने सांगितले की, कारखाना चालवताना विजेची समस्या हे मोठे आव्हान आहे. पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे. विभागाच्या दुर्लक्षामुळे वीजपुरवठा सुरळीत होत नाही. याबाबत अनेकवेळा तक्रारीही करण्यात आल्या. पण तरीसुद्धा विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही, अशी नाराजी त्याने व्यक्त केली आहे.