मुंबई, 01 नोव्हेंबर : सरकारतर्फे नेहमीच जनहिताच्या योजना राबवल्या जातात. अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा हाच यामागचा हेतू असतो. अनेकदा सरकारतर्फे रोजगाराच्याही योजना राबवल्या जातात. समाजातले मागासवर्गीय, वंचित घटकांसाठी या योजना उपकारक ठरतात. बिहारच्या राज्य सरकारने एक वेगळीच योजना राबवली आहे. त्या सरकारतर्फे घराच्या टेरेसवर लागवडीसाठी 50 टक्क्यांपर्यंत अर्थसाह्य दिलं जातं. सध्या तरी याचा लाभ शहरी क्षेत्रापुरता मर्यादित आहे. महाराष्ट्रात अशी योजना अद्याप नाही; मात्र ही अनोखी योजना नक्कीच जाणून घेण्यासारखी आहे. याबद्दल सविस्तर माहिती देणारं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलं आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. काळानुसार शेतीविषयक दृष्टिकोन बदलत चालला आहे. शहरीकरणामुळे शेती करणार्यांचं प्रमाण घटलं. शहारतही शेतीला चालना मिळण्यासाठी बिहार सरकार एक अनोखी योजना त्यांच्या राज्यात राबवतंय. काही अंशी तरी शेतीला चालना मिळेल, असा त्यामागचा उद्देश आहे. हेही वाचा - गुगल, एफबी, अॅमेझॉन सारख्या बड्या टेक कंपन्यांमधील भरतीला ब्रेक! भारतीयांसाठी धोक्याचा इशारा बिहार सरकारने शहरी क्षेत्रात शेतीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार, आपल्या घराच्या टेरेसवर फळझाडं, भाज्या, औषधी वनस्पती आदींची लागवड करणं शक्य आहे. यासाठी बिहार सरकार 50% सबसिडी देत आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास horticulture.bihar.gov.in या वेबसाइटवरून अर्ज करता येतो. बिहार सरकारच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारतर्फे 50,000 रुपयांच्या खर्चावर 50% अनुदान मिळतंय. परंतु, सध्या ही योजना केवळ पाटणाच्या शहरी भागापुरतीच मर्यादित आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गत पाटमा शहरातले नागरिक घराच्या गच्चीवर गाजर, वांगी, मुळा, टोमॅटो, मिरची, कोबी, भेंडी, पालेभाज्या, दुधी भोपळा आदींसारख्या विविध भाजीपाला पिकांची लागवड करू शकतात. याशिवाय, पेरू, लिंबू, पपई, डाळिंब, अंजीर यासारख्या फळझाडांचीही लागवड करणं शक्य आहे.याशिवाय औषधी वनस्पतींची लागवडही करता येते. त्यात कोरफड, कढीपत्ता, अडुळसा, अश्वगंधा आदींचा समावेश आहे.
बिहार सरकारतर्फे ही योजना राबवली जात आहे. यामुळे शहरी नागरिकांना घरबसल्या लागवड करून आर्थिक फायदा होणार आहे. शिवाय रिकाम्या गच्चीचा उत्पादक वापर करता येणार आहे. शिवाय वेळही सत्कारणी लावता येणर आहे. सरकारतर्फे मिळणार्या अनुदानामुळे या योजनेला गती मिळण्याची शक्यता आहे. घराच्या गच्चीत पिकवलेला शेतीमाल स्वच्छ, दर्जेदार असल्याने त्याची पौष्टिकता अधिक असेल. त्यामुळे पोषणासाठीही त्याचा चांगला उपयोग होईल.