मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मोठी बातमी! IT सेक्टरमध्ये Work From Home संपणार? 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवण्याच्या तयारीत

मोठी बातमी! IT सेक्टरमध्ये Work From Home संपणार? 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवण्याच्या तयारीत

Work From Home पूर्णपणे संपणार (Work From Home will end soon) अशी घोषणा एका IT कंपनीकडून करण्यात आली आहे.

Work From Home पूर्णपणे संपणार (Work From Home will end soon) अशी घोषणा एका IT कंपनीकडून करण्यात आली आहे.

Work From Home पूर्णपणे संपणार (Work From Home will end soon) अशी घोषणा एका IT कंपनीकडून करण्यात आली आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

बँगलोर, 06 सप्टेंबर: कोरोनामुळे (Corona Virus) गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशभारात अनेक कंपन्यांचं Work From Home सुरु आहे. ऑफिसमध्ये उगाच गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून Work From Home सुरु आहे. कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या घरी राहून काम करण्याची आणि कुटुंबासह वेळ घालवण्याची संधी मिळत आहे. मात्र आता हळूहळू कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत. तसंच निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे Work From Home पूर्णपणे संपणार (Work From Home will end soon) अशी घोषणा एका IT कंपनीकडून करण्यात आली आहे.

भारताची सर्वोच्च IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना 2021च्या अखेरीस ऑफिसमध्ये परत येण्यास (TCS Work From Home End) सांगू शकते असं इकॉनॉमिक टाइम्सच्या एका अहवालात म्हंटलं आहे. तसंच या संबंधीची माहिती खुद्द TCS चे CEO राजेश गोपीनाथन यांनी दिली आहे. त्यामुळे संपूर्ण IT क्षेत्रातच Work From Home संपणार का? (When work from Home will end) याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

TCS कंपनीनं कोरोना महामारीच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या आधारावर चालू कॅलेंडर वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत आपल्या 70-80% कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये कामावर बोलावण्याची योजना आखली आहे अशी माहिती TCS चे CEO राजेश गोपीनाथन यांनी दिली आहे.

हे वाचा - Schools Reopen: 'या' राज्यात आजपासून सुरु झाली शाळा; महाराष्ट्रात मुहूर्त कधी? वाचा सविस्तर

याआधी TCS या कंपनीनं  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून सर्वात आधी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी Work From Home ची योजना आखली होती. त्यानंतर दोन वर्षांपासून संपूर्ण कंपनी बंद होती आणि सर्व कर्मचारी Work From Home करत होते. तरीही TCS नं या कॅलेंडर वर्षांमध्ये मोठा नफा मिळवला होता. असं असूनही आता TCS नं आपल्या कर्मचाऱ्यांना परत ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

TCS आता आपल्या कर्मचाऱ्यांना या वर्षीच्या अखेरीस किंवा 2022 च्या सुरुवातीला ऑफिसमध्ये बोलवण्याची तयारीत आहे. त्यामुळे याचं अनुकरण करून इतर IT कंपन्यांही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावतात की Work From Home सुरु ठेवतात हेच बघावं लागेल.

First published:

Tags: TCS chairman, Technology, Work from home