रिपोर्ट- अनुज गौतम, सागर दमोह, 7 मार्च : महिलांच्या यशामध्ये परिवाराचे सहकार्य महत्त्वाचे असते, हे एका महिलेने यशातून दिसून आले आहे. परिवाराच्या सहकार्यनंतर एका महिलेने शास्त्रज्ञ पदापर्यंत मजल मारली आहे. पतीच्या सहकार्याने त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले. अर्शी नाज यांची महिलेची भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून निवड झाली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील टिळक गंज येथे राहणाऱ्या कुरेशी कुटुंबातील सून अर्शी नाज यांची इस्रो ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून निवड झाली आहे. दमोह जिल्ह्यातील लोकांनाही तिच्या यशाचा अभिमान आहे, कारण अर्शी नाज ही दमोहची मुलगी आहे. दमोह शहरातील अर्शी नाज या तीन बहिणी आहेत. तसेच त्यांना एका भाऊ आहे. अर्शी यांनी आपल्या कुटुंबासह दोन जिल्ह्यांचे नाव लौकिक मिळवले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांचे निधन - अर्शी नाज या दहावीत असताना त्यांचे वडीलांचे निधन झाले. यानंतरही आई खुर्शीद बेगम यांनी नोकरी करून मुलांचे उत्तम संगोपन केले. शेख अंजुम कुरेशी यांनी हे जग सोडल्यानंतर खुर्शीद बेगम यांनी आपल्या मुलांना धैर्याने वाढवले. पतीनेही दिली साथ - अर्शी यांचा विवाह 2016 मध्ये सागर येथे डॉ. असद उल्लाह कुरेशी यांच्याशी झाला. त्यांचे पती व्यवसायाने तांत्रिक अधिकारी आहे. तसेच NIT कुरुक्षेत्र येथे संशोधन लेखक देखील आहे. लग्नानंतर असद यांनी प्रथम अर्शी यांना एम.टेकला अभ्यासात प्रवेश मिळवून दिला आणि अर्शी यांनीही ऑनर्ससह पदवी पूर्ण केली. अर्शी यांनी कठोर परिश्रम आणि त्यांच्या अथक परिश्रमाने पहिल्याच प्रयत्नात जे.आर.एफ. ही अवघड परीक्षा उत्तीर्ण केली. अर्शी यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून निवड झाली आहे. Success Story : अवघ्या 15 दिवसात मोडले या IRS चे लग्न, 3 भाषा शिकून झाली अधिकारी नोकरी ही केवळ पैशासाठी नसते, तर त्यातून आत्मविश्वासही येतो. अर्शी यांना त्यांच्या आईचा पाठिंबा मिळाला, त्यानंतर त्यांना त्यांच्या पतीची साथ मिळाली. असद यांचे वडील आणि अर्शीचे सासरे समी कुरेशी यांनीही तिला सून नव्हे तर मुलगीसारखे वागवले आणि लग्नानंतर मुलाच्या इच्छेनुसार त्यांनी आपल्या सुनेला M.Tech मध्ये प्रवेश मिळवून दिला. महिलांच्या यशामध्ये परिवाराचे सहकार्य महत्त्वाचे असते, हे अर्शी यांच्या प्रवासातून दिसून येते. त्यांचा प्रवास हा निश्चित महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.