मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

कधी विचार केलाय? का तुम्हाला मिळत नाहीये मनासारखा जॉब? इतरांमध्ये काय आहे जे तुमच्यात नाही? इथे मिळेल उत्तर

कधी विचार केलाय? का तुम्हाला मिळत नाहीये मनासारखा जॉब? इतरांमध्ये काय आहे जे तुमच्यात नाही? इथे मिळेल उत्तर

Job Interview tips

Job Interview tips

नोकरीसाठी कशा प्रकारे अर्ज करावा (How to approach for a job) याबाबत माहिती मिळेल. चांगला शिस्तबद्ध रिझ्युम आणि अनुभवाचं कौशल्यपूर्ण वर्णन याचा तुमच्या एकूण कंटेंटवर काय प्रभाव पडतो, हेदेखील आपण जाणून घेणार आहोत.

मुंबई, 11 जुलै:  मुलाखतीमधून निवड होणारे उमेदवार, आणि रिजेक्ट होणारे उमेदवार यांच्यातला मोठा फरक म्हणजे दोनच गोष्टी असतात. एक म्हणजे कंटेंट, ज्यामध्ये रिझ्युम (Resume), सीव्ही (CV) अशा गोष्टींचा समावेश होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्सनॅलिटी. या लेखामध्ये तुम्हाला कंटेंट (What is Content in Interview) काय असतो आणि नोकरीसाठी कशा प्रकारे अर्ज करावा (How to approach for a job) याबाबत माहिती मिळेल. चांगला शिस्तबद्ध रिझ्युम आणि अनुभवाचं कौशल्यपूर्ण वर्णन याचा तुमच्या एकूण कंटेंटवर काय प्रभाव पडतो, हेदेखील आपण जाणून घेणार आहोत.

तुमचा रिझ्युम (How your Resume should be) हा एक स्टोरीबोर्ड आहे असं समजून चला. तुमचं लक्ष्य हेच आहे, की मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला एक आकर्षक गोष्ट सांगायची आहे, किंवा मग असं समजा, की एखाद्या रिक्रूटरला (What does recruiter see in Resume) काही सेकंदांमध्येच तुमची कथा सांगायची आहे. तुमची कथा चांगली असेल, तर मुलाखत घेणारी व्यक्ती ती कथा हायरिंग मॅनेजरकडे पाठवेल. तसंच पुढच्या फेरीसाठी तुमची शिफारस करेल.

90% उमेदवार Resume बनवताना करतात चूका; म्हणूनच असा बनवा पॉवरफुल Resume; जॉब फक्त तुमचाच

निवड झालेले उमेदवार आणि रिजेक्ट झालेले उमेदवार यांच्यामध्ये हा प्राथमिक फरक असतो. अर्थात, तुमचं संवादकौशल्य उत्तम असेल, तर गोष्टी बदलू शकतात. शैक्षणिकदृष्ट्या निपुण आणि कुशल उमेदवारदेखील मुलाखतींमध्ये माती खातात. शैक्षणिकदृष्ट्‍या पात्र असलेले उमेदवारही केवळ आपली कथा योग्य प्रकारे मांडता न आल्यामुळे रिजेक्ट झाले आहेत.

तीन गोष्टी तुम्हाला मदत करतील 

1. तुमची कौशल्यं उठून दिसण्यासाठी इलस्ट्रेशन्सचा (Use illustrations to highlight your skills) वापर करा. ज्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे येत नाहीत किंवा तुमचे स्ट्राँग पॉइंट्स नसलेल्यांचा उल्लेख टाळा. तुमच्या भूतकाळातल्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात, त्यातून तुम्ही कोणती कौशल्यं आत्मसात केलीत, यावरून तुमची निवड केली जाते.

2. तुम्ही तुमच्या कामाप्रति किती कमिटेड आहात, तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या शिक्षणातून, कोर्सेसमधून किंवा कामाच्या अनुभवातून काय शिकला (Skills you learned from past experience) आहात. तुम्ही या सगळ्यातून कशा प्रकारे प्रगती केली आहे आणि नवीन कौशल्यं आत्मसात करण्याची तुमची क्षमता कशी आहे?

3. तुमचे नेतृत्वगुण (Leadership skills) कसे आहेत, तुम्ही कोणत्या प्रकारची कम्युनिटी मॅनेज केली आहे, तसंच तुम्ही इतर कोणते उपक्रम केले आहेत या गोष्टीदेखील लक्षात घेतल्या जातात.

EQ  (Emotional Quotient) महत्त्वाचा 

याव्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो लक्षात घेतला जातो, तो म्हणजे तुमचा EQ  (Emotional Quotient) तीन गोष्टींचा समावेश होतो.

1. तुम्ही एका टीममध्ये कशा प्रकारे काम कराल?

2. तुम्ही एखाद्या टीमचं नेतृत्व कशा प्रकारे कराल?

3. तुम्ही कंपनीचं व्हिजन म्हणजेच दृष्टिकोनासोबत कशा प्रकारे जुळवून घ्याल.

अहो, भीती वगैरे सोडा; 'या' सुपर टिप्स फॉलो करा आणि बिनधास्त द्या Job Interview

एक कुशल निवड समिती ही उमेदवाराच्या मानसिकतेचं मूल्यांकन करते हे लक्षात घ्या. उमेदवार तणावपूर्ण परिस्थिती कशा प्रकारे हाताळतात, त्या परिस्थितीची जबाबदारी ते घेतात की नाही, हे पाहिलं जातं.

हीच गोष्ट एका एंट्री-लेव्हल उमेदवाराला शिडी चढून सीनियर-लेव्हल किंवा लीडरशिप पदावर नेऊन ठेवते. तुमचा रिझ्युम तुम्ही लोकांना कशा प्रकारे सांभाळता आणि प्रेरणा देता याबाबत माहिती देत असतो. त्यामुळे तुमच्या कामातून तुम्ही काय परिणाम साधला आहे, हे सांगण्यावर भर देणं गरजेचं आहे. शेवटी, निकाल महत्त्वाचा आहे!

First published:

Tags: Career, Career in danger, Career opportunities, Job, Jobs Exams