अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी बदायूं, 15 जून : उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या विभू उपाध्यायने नीट (NEET) परीक्षेत मोठे स्थान पटकावले आहे. दररोज गंगा आरती करणाऱ्या विभूने पहिल्याच प्रयत्नात 720 पैकी 622 गुण मिळवले आहेत. भारतात विभूचा क्रमांक 622 वा आला आहे. तर विभूने याचे श्रेय गंगा मैय्याला दिले आहे. 15 जानेवारी 2019 रोजी कछला गंगा घाटावर नियमित गंगा आरती सुरू झाली होती आणि तेव्हापासून विभू येथे दररोज गंगा आरती करायला यायचा. जानेवारी 2019 मध्ये, त्यावेळचे जिल्ह्याचे तत्कालीन डीएम दिनेश कुमार सिंह यांनी बदायूंमधील कछला गंगा घाट येथे वाराणसीच्या धर्तीवर नियमित गंगा आरती करण्याचा निर्णय घेतला. त्यां च्या या निर्णयानंतरच बदायूंतील वाराणसीच्या धर्तीवर गंगा घाटावर नियमित आरती सुरू झाली. गंगा आरतीसाठी ब्राह्मण अर्चकांची गरज होती, म्हणून त्या वेळी विभू त्यासाठी पुढे आले. पालकांची परवानगी घेतली आणि अभ्यासाबरोबरच रोज संध्याकाळी आरती करायला सुरुवात केली.
पुन्हा सुरू करणार आरती - त्यानंतर विभूने 1 वर्षापूर्वी बदायूं सोडले आणि कोटा येथे नीट (NEET) परीक्षेसाठी कोचिंगमध्ये तो रुजू झाला आणि तिथे त्याने अभ्यास सुरू केला. त्याच्या मेहनतीमुळे आणि मां गंगेच्या आशीर्वादामुळे तो आता नीट (NEET) परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. विभू उपाध्याय यांनी याचे संपूर्ण श्रेय त्यांचे पालक आणि माजी डीएम दिनेश कुमार सिंह यांच्यासह गंगा मैया यांना दिले. गेल्या तीन-चार वर्षांपासून तो यासाठी तयारी करत होता. आता वेळ मिळेल तेव्हा पुन्हा गंगा आरतीत सहभागी होणार असल्याचा विभू म्हणाला.
सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू - विभूच्या या यशानंतर संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येकजण हा गंगामैय्याचा आशीर्वाद असल्याचे सांगत आहे. सोशल मीडियावरही लोक यासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट टाकत आहेत.