मराठी बातम्या /बातम्या /करिअर /UPSC Civil Service 2023: ग्रॅज्युएट उमेदवारांच्या तब्बल 1105 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; लगेच करा अप्लाय

UPSC Civil Service 2023: ग्रॅज्युएट उमेदवारांच्या तब्बल 1105 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; लगेच करा अप्लाय

संघ लोक सेवा आयोग

संघ लोक सेवा आयोग

28 मे रोजी होणार्‍या या प्राथमिक नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून आयोग मुख्य परीक्षेसाठी स्क्रीनिंग चाचणी घेईल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 फेब्रुवारी:   केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2023साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. भारतीय वन सेवेतली रिक्त पदं भरण्यासाठी ही अधिसूचना आहे. upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन इच्छुक उमेदवार 21 फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. 28 मे रोजी होणार्‍या या प्राथमिक नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून आयोग मुख्य परीक्षेसाठी स्क्रीनिंग चाचणी घेईल. अधिकृत सूचनेनुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये (2023) होणं अपेक्षित आहे.

आयोगानं दिलेल्या अधिसूचनेनुसार, या वेळी भरती मोहिमेद्वारे 1105 पदं भरली जातील. यूपीएससीने गेल्या सात वर्षांत अधिसूचित केलेली ही सर्वाधिक रिक्त जागांची भरती आहे. गेल्या वर्षी 1011 रिक्त पदांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. 2016मधल्या अधिसूचनेत रिक्त पदांची संख्या एक हजारापेक्षा जास्त होती. तेव्हा 1079 रिक्त पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. 2017मध्ये, 980, 2018मध्ये 782, 2019मध्ये 896 आणि 2020मध्ये, रिक्त पदांची संख्या 796 होती. 2021मध्ये रिक्त पदांची संख्या 712 इतकी होती.

GATE 2023: परीक्षेसाठी सेंटरवर जाण्याआधी या गाईडलाईन्स वाचल्यात ना? अन्यथा होऊ शकते गडबड

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2023 : पात्रता निकष

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या व्यक्तीने 1 ऑगस्ट 2023 पर्यंत वयाची किमान 21 वर्षं पूर्ण केलेली असली पाहिजेत. कमाल वयोमर्यादा 32 वर्षं आहे. आरक्षित श्रेणीतल्या अर्जदारांसाठी कमाल वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता : केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञान, संख्याशास्त्र आणि प्राणिशास्त्र यांपैकी किमान एका विषयात पदवीधर असणं आवश्यक आहे. किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी, वनशास्त्र किंवा अभियांत्रिकी या विषयात पदवीधर अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे.

Competitive Exams: MPSC असो वा NEET कोणतीही स्पर्धा परीक्षा एका झटक्यात होईल क्रॅक; अशी करा स्मार्ट स्टडी

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2023 : नोंदणी प्रक्रिया

स्टेप 1 : upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

स्टेप 2 : ‘यूपीएससी परीक्षा आणि ऑनलाइन अर्जासाठी ओटीआर’ लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : नवीन ओपन झालेल्या पेजवर 'भाग 1' नोंदणी फॉर्म भरा, फी भरा आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रं अपलोड करा.

स्टेप 4 : नंतर परीक्षा केंद्र निवडा आणि फॉर्म सबमिट करा.

स्टेप 5 : यूपीएससी आयएफएस फॉर्म सेव्ह आणि डाउनलोड करा.

स्टेप 6 : भविष्यातल्या संदर्भासाठी किंवा वापरासाठी फॉर्मची प्रिंटआउट घ्या.

Work From Home सोडून रोज टाईमपास करत होती महिला; एका सॉफ्टवेअरनं केली पोलखोल

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2023 : अर्ज फी

यूपीएससी भारतीय वन सेवा परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. एससी, एसटी, बेंचमार्क दिव्यांग असलेल्या व्यक्ती आणि महिला उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. अधिकृत सूचनेतल्या माहितीनुसार, "कर्मचारी संख्येमध्ये लिंग समतोल असावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि त्यामुळे महिला उमेदवारांना अर्ज करण्यास प्रोत्साहित केलं जातं आहे." अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार मुख्य साइटवरची अधिसूचना वाचू शकतात.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams