मुंबई, 19 जुलै: युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने (UGC) एक नोटीस जारी करत विद्यार्थ्यांना राज्यातील वर्धा जिल्ह्यातील एका विद्यापीठात कधीच प्रवेश न घेणायचे निर्देश दिले आहेत. हे विद्यापीठ अमान्य आहे असं म्हणत UGC नं एक परिपत्रक काढून हे आवाहन केलं आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल युनिव्हर्सिटी ऑफ स्किल रिसर्जेन्स, वर्धा मध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन करणारी नोटीस जारी केली आहे. यूजीसीने या संस्थेला अवैध घोषित केले असून ते यूजीसी कायदा 1956 चे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात यूजीसीने नोटीस जारी करून लिहिले की, ‘डिजिटल युनिव्हर्सिटी ऑफ स्किल रिसर्जेन्स, वर्धा, महाराष्ट्र, विविध अभ्यासक्रम चालवत आहे, जे यूजीसी कायदा 1950 चे उल्लंघन आहे.’ म्हणूनच हे विद्यापीठ अमान्य आहे. आणि या विद्यपीठात कोणीही प्रवेश घेऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
Calling it a "self-styled institution", UGC cautions students not to take admission into 'Digital University of Skill Resurgence', Wardha (Maharashtra) which offers various courses/programs "in gross violation of UGC Act, 1956." pic.twitter.com/ocA1TmdpeZ
— ANI (@ANI) July 19, 2022
यूजीसीने नियमांचा हवाला देत म्हटले आहे की, कोणत्याही केंद्र, प्रांतिक किंवा राज्य कायद्याने स्थापन न केलेल्या संस्थेला विद्यापीठ म्हणता येणार नाही. अशा स्थितीत वरील संस्थेला आपल्या नावाने विद्यापीठ स्थापन करण्याचा अधिकार नाही. तसेच यूजीसीने विद्यार्थ्यांनी अशा संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नये, अन्यथा त्यांच्या करिअरला फटका बसू शकतो, असे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांना आपलं करिअर चांगला करायचं असेल तर या विद्यापीठात कधीच प्रवेश घेऊ नका असं आवाहन करण्यात आलं आहे. जे विद्यापीठ कायद्याचं उल्लंघन करत आहे त्या विद्यापीठात शिकून विद्यार्थ्यांचा नुकसान होऊ शकतं म्हणून या सूचना देण्यात आल्या आहेत.