जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / मोठी बातमी! ओपन आणि डिस्टन्स लर्निंग घेण्याआधी 'या' गोष्टी चेक कराच; UGC नं जारी केल्या गाईडलाईन्स

मोठी बातमी! ओपन आणि डिस्टन्स लर्निंग घेण्याआधी 'या' गोष्टी चेक कराच; UGC नं जारी केल्या गाईडलाईन्स

डिस्टन्स लर्निंग

डिस्टन्स लर्निंग

Open & Distance learning: विद्यार्थ्यांसाठी UGC नं काही गाईडलाईन्स (UGC guidelines for Open & Distance learning) जारी केल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 सप्टेंबर: आजकाल बऱ्याच तरुण तरुणींना फार कमी वयात नोकरी मिळते. ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या नोकरी मिळाल्यामुळे अनेक जण नोकरी करतात. मात्र काही वर्षांनंतर त्यांना उच्च शिक्षणाची ओढ लागते. मात्र नोकरी असल्यामुळे ते फुल टाइम शिक्षण घेऊ शकत नाहीत. म्हणूनच मग अशा विद्यार्थ्यांसाठी ओपन आणि डिस्टन्स लर्निंगची सुविधा असते. देशातील काही कॉलेजेस अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा दूरस्थ शिक्षण देतात. पण अनेकदा विद्यार्थी काही मान्यता नसलेल्या कॉलेजेसच्या आमिषाला बळी पडतात. म्हणूनच अशा विद्यार्थ्यांसाठी UGC नं काही गाईडलाईन्स (UGC guidelines for Open & Distance learning) जारी केल्या आहेत. यामध्ये उच्च शिक्षण संस्था (HEI) ची ओळख आणि अभ्यासक्रमांची मान्यता दर्जा सुनिश्चित करणं आणि प्रतिबंधित अभ्यासक्रम सूचीमधून वगळणं यासंबंधी गाईडलाईन्स आहेत. आयोगानं 17 कार्यक्रमांची यादी देखील अधिसूचित केली आहे ज्यांना ODL आणि ऑनलाइन मोड अंतर्गत ऑफर करण्यास मनाई आहे. तब्बल 31,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; NIV मुंबईत मिळतेय सरकारी नोकरीची संधी; घ्या अप्लाय Link काय आहेत UGC च्या गाईडलाईन्स UGC ने मार्गदर्शक तत्त्वात म्हंटलं आहे की, विद्यार्थ्यांनी उच्च शैक्षणिक संस्थांचा दर्जा सुनिश्चित केला पाहिजे, ज्यामध्ये मान्यता आणि पात्रता अटींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी हे देखील तपासलं पाहिजे की कोणत्या हायर एज्युकेशन इन्स्टिटयूटला डिस्टन्स लर्निंग किंवा ऑनलाइन प्रोग्राम ऑफर करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलं आहे . तसंच ज्या इन्स्टिट्यूट्सना नो अॅडमिशन कॅटेगरी अंतर्गत ठेवण्यात आलं आहे अशांकडे विद्यार्थ्यांनी जात कामा नये. कसं करा चेक विद्यार्थ्यांनी आयोगाच्या वेबसाइटवर हायर एज्युकेशन इन्स्टिटयूटचे तपशील, त्याची कागदपत्रं, अर्ज, प्रतिज्ञापत्र पूर्णपणे तपासणं आवश्यक आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला HEI च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये काही त्रुटी आढळल्यास, त्याला लगेच UGC ला कळवावे लागेल. Railway च्या परीक्षेची तयारी करताय? मग तुमची नोकरी पक्की; फक्त असा करा अभ्यास 17 प्रोग्राम्सची लिस्ट जाहीर आयोगाने जाहीर केलेल्या 17 कार्यक्रमांच्या यादीत अभियांत्रिकी, औषध, शारीरिक उपचार, फार्मसी, हॉटेल व्यवस्थापन, फलोत्पादन, नर्सिंग, कायदा, कृषी, खानपान तंत्रज्ञान, विमान देखभाल, दृश्य कला आणि क्रीडा यांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात