नवी दिल्ली, 03 ऑगस्ट: देशभरात नुकतेच बोर्डाचे निकाल जाहीर झाले आहेत. तसंच बारावी बोर्डाचे निकाल (Maharashtra Board Result) आल्यानं कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणूनच विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) 24 बनावट इन्स्टिट्यूटची (Fake Institutes) यादी घोषित केली आहे. तसंच 2 इतर इन्स्टिट्यूट नियमांच उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Education minister Dharmendra Pradhan) म्हणाले की, यूजीसीने बनावट म्हणून घोषित केलेल्या 24 संस्थांपैकी आठ उत्तर प्रदेशात, सात दिल्लीत आहेत. विद्यार्थी, पालक, नागरिक तसंच प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे युजीसीनं बोगस घोषित केलं आहे,' अशी माहिती त्यांनी दिली.
हे वाचा - Explainer: बोर्डाच्या परीक्षेत नेहमी मुलीच का ठरतात अव्वल? इथे मिळेल उत्तर
सर्वाधिक बनावट इन्स्टिट्यूट्स (Fake institutes in India) असणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात आठ बनावट इन्स्टिट्यूट्स असून दिल्लीमध्ये सात आहेत.ओडिशा आणि बंगालमध्ये प्रत्येकी दोन बनावट इन्स्टिट्यूट्स असून कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पाँडिचेरीत प्रत्येकी एक विद्यापीठ आहे.
याशिवाय लखनऊमधील भारतीय शिक्षा परिषद आणि नवी दिल्लीमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंटकडून युजीसीच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचं समोर आले आहे. या दोन्ही संस्थांचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. महाराष्ट्रातील हे बनावट इन्स्टिट्यूट्स नागपुरात असून राजा अरेबिक युनिव्हर्सिटी असं नाव आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.