मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

विद्यार्थ्यांनो, इतर देशांमध्ये शिकताना Ukraine War सारखी Emergency आल्यास नक्की काय करावं? इथे वाचा महत्त्वाची माहिती

विद्यार्थ्यांनो, इतर देशांमध्ये शिकताना Ukraine War सारखी Emergency आल्यास नक्की काय करावं? इथे वाचा महत्त्वाची माहिती

Emergency आल्यास नक्की काय करावं

Emergency आल्यास नक्की काय करावं

तुम्हीही परदेशात (How to handle Emergency like Ukraine in other countries) गेलात आणि अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली (What to do if emergency occur) तर तुम्ही घाबरणार नाही.

    मुंबई, 24 फेब्रुवारी: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेनच्या वादाला (Russia-Ukraine War) आज हिंसक वळण आलं आहे. आज सकाळी रशियानं युक्रेनवर लष्करी आक्रमण (Russia attacked on Ukraine) केलं आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध (World war III) सुरु झालं आहे. युक्रेनमध्ये सर्व सत्ता मिलिट्रीनं आपल्या हातात घेतली आहे. यामध्ये अनेकांचा जीवही गेला आहे. मात्र या सगळ्यात आपल्या भारतातील अनेक विद्यार्थी (Indian students in Ukraine) जे परदेश शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले होते अशांचे हाल होत आहेत. अशा विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी गेलेल्या एअर इंडियाच्या विमानालाही परत यावं लागलंय. त्यामुळे सर्व विद्यार्थी अडकून (Students trapped in Ukraine) बसले आहेत आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला अशा काही मौल्यवान टिप्स (Tips to handle Emergency) देणार आहोत ज्यामुळे तुम्हीही परदेशात (How to handle Emergency like Ukraine in other countries) गेलात आणि अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली (What to do if emergency occur) तर तुम्ही घाबरणार नाही. तसंच अशी स्थिती आल्यास Emergency आल्यास नक्की काय करावं हे ही सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. सुरुवातीला रिसर्च करा कोणत्याही देशात शिक्षणासाठी किंवा फिरण्यासाठी जाताना त्या देशाबद्दल, त्या देशातील शहरांबद्दल आणि तुम्ही जिथे जाणार आहेत अशा काही जागांबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. ज्या शहरात राहून तुम्ही शिक्षण घेणार आहात त्या शहरातील महत्त्वाचे रस्ते कोणते, तिथे राहण्यासाठी सुरक्षित जागा कोणत्या याबाबत तुम्ही संपूर्ण घेतली असणं आवश्यक आहे. नवीन शहरामध्ये आणि नवीन देशामध्ये राहत असताना अशाप्रकारची Emergency आली तर ही माहिती तुम्हाला तिथून बाहेर निघण्यास मदत करू शकते. म्हणून सुरुवातीला संपूर्ण रिसर्च करूनच इतर देशांमध्ये जा. Emergency Fund : संकटकाळात कमी वेळेत पैसे कसे जमवायचे? काय आहेत विविध पर्याय? देशातील कायद्यांबाबत माहिती घ्या काही देशांमध्ये अनेक प्रकारचे विचित्र आणि थक्क करणारे कायदे आहेत. जर तुम्हीही अशा देशांमध्ये जाणार असाल तर एकदा विचार करा. त्या देशांमध्ये असलेल्या कायद्यांबाबत संपूर्ण माहिती घ्या. जर अशा देशांमध्ये तुम्ही कायद्या विरोधात वागलात तर अडचणीत येऊ शकता. तसंच युक्रेनसारखी परिस्थिती आलीच तर याच कायद्याचं ज्ञान असल्यामुळे तुम्हाला तिथून लवकर निघत येईल. Emergency साठी संपूर्णपणे तयार राहा तुमचा पासपोर्ट, व्हिसा आणि एअरलाइन आणि राहण्याच्या ठिकाणाचं प्रूफ यासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या कॉपीज बनवून ठेवा. तसाच त्या कॉपीज मूळ कागदपत्रांपासून वेगळ्या ठेवा. तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन किंवा टॅबलेटवर डिजिटल कॉपी देखील ठेवू शकता. जर युक्रेनसारखी परिस्थिती आल्यास तुमच्याकडे एक कॉपी नसेल तर दुसरी कॉपी तुमच्याडॆ असेल ज्यामुळे तुम्ही तिथून सुरक्षित बाहेर पडू शकता. भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहा कोणत्याही दुसऱ्या देशात शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथल्या भारतीय दूतावासाला कळवणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्याजवळ तुमचे कुटुंबीय नसतील पण भारतीय दूतावासाच्या संपर्कात असल्यास तुम्हाला कुठलीही अडचण आली तरी चिंता करण्याची गरज नाही. भारतीय दूतावास नेहमी तुमच्या मदतीला येईल. म्हणूनच युक्रेनसारखी परिस्थिती आली तर भारतीय दूतावास तुम्हाला संपर्क करेल आणि तुम्हाला सुरक्षित स्थळी किंवा भारतात पाठवेल. म्हणून तुमची संपूर्ण माहिती भारतीय दूतावासाकडे असणं आवश्यक आहे. रशिया सध्या कोणत्या देशांना आपला मित्र मानतोय आणि का? भारत कोणाच्या बाजूने? स्वतःच्या सुरक्षिततेला महत्त्वं द्या तुम्ही कोणत्याही देशात शिकत असताना युक्रेनसारखी किंवा त्याहूनही बिकट परिस्थिती आली तरी हार मानू नका, खचून जाऊ नका. स्वतःला सुरक्षित ठेवा. एकटे राहू नका. तुमच्या संपर्कातील लोकांसोबत राहा. सर्वजण सोबत असतील तर तुम्हाला भीती वाटणार नाही. तसंच सतत फोनच्या माध्यमातून कुटुंबियांना खुशाली कळवत राहा. यामुळे त्यांना चिंता वाटणार नाही. परिस्थिती कशीही असो संकटाला तोंड द्या आणि त्यावर यशस्वीपणे मात करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Russia Ukraine, War, World news

    पुढील बातम्या