जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / सावधान! ऑफिस पॉलिटिक्समुळे तुमचं करिअर येऊ शकतं संकटात; कसं कराल Avoid? इथे मिळतील टिप्स

सावधान! ऑफिस पॉलिटिक्समुळे तुमचं करिअर येऊ शकतं संकटात; कसं कराल Avoid? इथे मिळतील टिप्स

ऑफिस पॉलिटिक्सच्या असं राहा दूर

ऑफिस पॉलिटिक्सच्या असं राहा दूर

तुमच्याही ऑफिसमध्ये हे सर्व प्रकार सुरु असतील आणि तुम्हाला याच्या दूर राहायचं असेल तर आज आम्ही तुम्हा काही टिप्स (Tips to Avoid Office Politics) सांगणार आहोत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 ऑगस्ट: कोरोनानंतर सर्व ऑफिसेस आता पुन्हा सुरु झाले आहेत. तब्बल दोन वर्षांच्या गॅपनंतर आता ऑफिसमध्ये तीच लगबग सुरु झाली आहे. ऑफिसमधील अनेक सहकारी, अनेक गोष्टी बदलल्या आहेत. मात्र कोणत्याच ऑफिसमध्ये एक गोष्ट कधीच बदलू शकत नाही किंवा संपू शकत नाही. ती म्हणजे ऑफिस पॉलिटिक्स. एकमेकांबद्दल मागे बोलणे, किंवा कोणाची मुद्दाम टिंगलटवाळी करणे हा ऑफिस पॉलिटिक्सचा एक भाग असतो. अनेकजण यामध्ये आपली नोकरी गमावतात. तर अनेकांना ऑफिस पॉलिटिक्समुळे प्रचंड त्रास होतो. काही जणांना हे करण्यात मजा येते अर्थात त्यांचा यात स्वार्थ असतो. पण तुमच्याही ऑफिसमध्ये हे सर्व प्रकार सुरु असतील आणि तुम्हाला याच्या दूर राहायचं असेल तर आज आम्ही तुम्हा काही टिप्स (Tips to Avoid Office Politics) सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. क्या बात है! फ्रेशर्ससाठी IIT मध्ये फ्री कोर्सेस आणि Sony कंपनीत जॉबही; करा अर्ज

स्वतःपासून सुरुवात करा

बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी असे म्हणतात, त्यामुळे ही गोष्ट इथेही लागू पडते, त्यामुळे गॉसिपपासून दूर राहा. जेव्हा तुम्हाला असे वाटते की काही लोक असे बोलत आहेत, तेव्हा तुम्ही कामाचा हवाला देऊन ग्रुप सोडू शकता. गोष्टी बदला जर तुम्हाला वाटत असेल की हा गट सोडणे कठीण आहे किंवा सहकारी काय म्हणतील, तर तुम्ही कुजबुजत असताना प्रकरण बदलण्याचा प्रयत्न करा. म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही चालू असलेली गोष्ट मधेच बदलून कामावर आणता. या प्रयत्नाने तुम्ही गॉसिपही टाळू शकता Resume वाटून थकलात? टेन्शन नॉट; आता कंपन्या देतील जॉब ऑफर; हे स्किल्स असणं IMP

अशा लोकांपासून अंतर ठेवा

या प्रयत्नांनंतरही तुम्ही स्वत:ला वाचवू शकत नसाल तर अशा लोकांपासून थेट अंतर ठेवावे. हे शक्य आहे की अशा लोकांना क्षणभर तुमच्या हालचालीबद्दल वाईट वाटेल, परंतु तुम्ही त्याकडे लक्ष न देता पुढे जाता. तुम्ही या वर्तुळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला याबद्दल कोणीही प्रश्न विचारू नये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात