Home /News /career /

येत्या आर्थिक वर्षात 'या' तीन IT कंपन्यांमध्ये मेगा भरती, एक लाखांहून अधिक कर्मचारी करणार नियुक्त

येत्या आर्थिक वर्षात 'या' तीन IT कंपन्यांमध्ये मेगा भरती, एक लाखांहून अधिक कर्मचारी करणार नियुक्त

या तिन्ही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नफा मिळवला आहे. गेल्यावर्षी (2021) या कंपन्यांनी विक्रमी 1.7 लाख कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्या होत्या. हीच नियुक्ती मोहीम (hiring drive) 2022 या फायनान्शियल इयरमध्येही सुरू राहणार असल्याचं या आयटी दिग्गजांनी जाहीर केलं आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 14 जानेवारी: आयटी (IT) क्षेत्रातील मेजर प्लेयर्स असलेल्या टीसीएस (TCS), विप्रो (Wipro) आणि इन्फोसिसनं (Infosys) अलीकडेच आपापल्या तिसर्‍या तिमाहीचे रिझल्टस जाहीर केले. या तिन्ही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नफा मिळवला आहे. गेल्यावर्षी (2021) या कंपन्यांनी विक्रमी 1.7 लाख कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्या होत्या. हीच नियुक्ती मोहीम (hiring drive) 2022 या फायनान्शियल इयरमध्येही सुरू राहणार असल्याचं या आयटी दिग्गजांनी जाहीर केलं आहे. 2020 मध्ये तिन्ही आयटी कंपन्यांनी मिळून फक्त 31 हजार कर्मचारी नियुक्त केले होते. महामारीच्या काळात भारताने मोठ्या प्रमाणावर डिजिटल मोडमध्ये (digital mode) प्रवेश केला आहे. याशिवाय गेल्या वर्षभरात या कंपन्यांनी कर्मचारी भरती वाढवली आहे. येत्या आर्थिक वर्षात या तिन्ही आयटी कंपन्यांचे हायरिंग प्लॅन काय आहेत, याची माहिती आपण घेऊया... 2022मध्ये इन्फोसिस देणार इतक्या नोकऱ्या भारतातील दुसरी सर्वांत मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसनं (Infosys) बुधवारी (12 जानेवारी) आपली येत्या आर्थिक वर्षातील कर्मचारी भरती योजना जाहीर केली आहे. येत्या आर्थिक वर्षात, ग्लोबल ग्रॅज्युएट हायरिंग प्रोग्रामचा (global graduate hiring programme) भाग म्हणून 55 हजार पेक्षा जास्त फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा विचार कंपनी करत आहे. डिसेंबर 2021मध्ये संपलेल्या तिमाहीचे रिझल्ट्स जाहीर करताना ही माहिती देण्यात आली. 'आम्ही टॅलेंट अ‍ॅक्विझिशन (talent acquisition) आणि डेव्हलपमेंटमधील (development) गुंतवणुकीला प्राधान्य देत आहोत. यासाठी ग्लोबल ग्रॅज्युएट हायरिंग प्रोग्रामअंतर्गत 2022मध्ये 55 हजार पेक्षा जास्त नोकऱ्या देण्याचा आमचा विचार आहे,' अशी माहिती इन्फोसिसचे चीफ फायनान्शियल ऑफिसर निलांजन रॉय (Nilanjan Roy) यांनी दिली. डिसेंबर 2021पर्यंत कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या दोन लाख 79 हजार 617 वरून दोन लाख 92 हजार 67 वर गेली होती. 'ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमची टॅलेंट स्ट्रॅटेजी चांगली असणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही कर्मचार्‍यांचं हित जोपासून त्यांची स्किल्स आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असं इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलील पारेख (Salil Parekh) यांनी स्पष्ट केलं. 2022मध्येही सुरू राहणार टीसीएसची नोकरभरती इन्फोसिसप्रमाणं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनंसुद्धा (TCS) बुधवारी आपले तिमाहीचे रिझल्ट्स जाहीर केले आहेत. 2022मध्ये टीसीएस आपली कर्मचारीभरती मोहीम सुरुच ठेवणार आहे. मात्र, वर्षभरात कंपन्या किती नोकऱ्या देणार आहे याबाबतची आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. 'आमची कर्मचारी भरती आहे त्याचं स्पीडनं सुरू राहील. पण, येत्या तिमाहीत किती नियुक्ती केली जाईल याची विशिष्ट आकडेवारी आम्ही सध्या निश्चित केलेली नाही', असं कंपनीचे चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर (chief human resources officer) मिलिंद लक्कड (Milind Lakkad) यांनी मीडियाला सांगितलं. देशातील सर्वांत मोठी सॉफ्टवेअर एक्सपोर्टर असेलल्या टीसीएसनं नुकताच दोन लाख कर्मचारी संख्येचा टप्पा गाठला आहे. वर्कफोर्सचा (workforce) विचार केल्यास टीसीएस ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. यापूर्वी, टीसीएसनं मार्चपर्यंत 34 हजार फ्रेशर्सची (freshers) नियुक्ती करणार असल्याचं सांगितलं होतं. पण, कंपनीनं हे टारगेट आधीच पूर्ण केलं आहे. असं असूनही कंपनीनं जानेवारी ते मार्च या तिमाहीत आपली नियुक्ती प्रक्रिया (hiring procedure) सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 2022मध्ये विप्रो देणार इतक्या नोकऱ्या विप्रो 2023 या आर्थिक वर्षामध्ये सुमारे 30 हजार फ्रेशर्सला नोकऱ्या देण्याच्या विचारात आहे. आयटी क्षेत्रातील सध्याची स्थिती पाहता भविष्यात आयटीला जास्त मागणी असणार आहे. मागणी वाढलेली असताना पुरवठ्यामध्ये अडथळे येऊ नये यासाठी पुरेशी कर्मचारी संख्या असणं आवश्यक आहे. त्यामुळं गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून 70 टक्क्यांहून अधिक फ्रेशर्सना ऑनबोर्ड (onboard) घेण्याचा विचार कंपनी करत आहे. 2022मध्ये विप्रोनं सुमारे 17 हजार 500 जणांना नोकरी दिली आहे. उर्वरित 2022 आणि 23 मध्ये आणखी 30 हजार फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा विचार कंपनी करत आहे, अशी माहिती विप्रोचे प्रेसिडेंट (President) आणि सीएचआरओ सौरभ गोविल (Saurabh Govil) यांनी दिली आहे. येत्या आर्थिक वर्षात देशातील तीन मोठ्या आयटी कंपन्या साधारण लाखभर नोकऱ्या देण्याचा विचार करत आहेत. आयटी आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या ग्रज्युएट्ससाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Career opportunities, Job

पुढील बातम्या