जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / पुढील 25 वर्षांत गायब होणार 'या' नोकऱ्या; यादीत तुमचा जॉब तर नाही ना चेक करा

पुढील 25 वर्षांत गायब होणार 'या' नोकऱ्या; यादीत तुमचा जॉब तर नाही ना चेक करा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

25 वर्षांनी तुमचा जॉबही धोक्यात तर नाही ना?

    मुंबई, 30 जून : जगभरात बेरोजगारी (Unemployment) प्रचंड प्रमाणात वाढली आहे. लोकसंख्या जितक्या वेगानं वाढली, तितक्या वेगानं नोकरीच्या (Jobs) संधी वाढल्या नाहीत. परिणामी बेरोजगारी वाढली. येत्या काळात बेरोजगारीचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या (Oxford University) वतीने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाच्या आधारे, पुढील 25 वर्षांत रोजगाराच्या संधी लक्षणीयरीत्या कमी होतील, असा इशारा देण्यात आला आहे. ज्या कामांच्या बदल्यात कर्मचारी सध्या पगार घेत आहेत, कंपन्या स्वतःच्या फायद्यासाठी रोबोट्सच्या (Robots) साह्याने ही कामं करून घेऊ लागतील. रोबोट्सच्या माध्यमातून कामं होऊ लागल्यास जगभरात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल. आम्ही तुम्हाला या जॉब लिस्टमधल्या प्रमुख नोकऱ्यांविषयी सांगणार आहोत. सध्या या नोकऱ्या अनेक जण करत असले, तरी भविष्यात ही स्थिती अशीच राहील का, हे सांगणं कठीण आहे. वेअरहाउस वर्कर (Warehouse Workers) : अ‍ॅमेझॉनसारख्या (Amazon) बड्या कंपन्यांची स्वतःची वेगळी वेअरहाउसेस आहेत. या वेअरहाउसमध्ये सामानाची साठवणूक केली जाते. वेअरहाउसमध्ये स्टॉक करण्यासाठी तो मेन्टेन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगार नियुक्त केले जातात; पण येत्या काळात ही कामं रोबोट्सच्या माध्यमातून केली जातील. `रोबोट्समध्ये एखादा लहानसा तांत्रिक बिघाड झाला, तरी मोठं नुकसान होऊ शकतं. यामुळे आमची वेअरहाउसेस कधीही 100 टक्के रोबोट्सवर अवलंबून राहणार नाहीत. आमच्या वेअरहाउसमध्ये कायम कामगार कार्यरत राहतील; पण असं असलं तरी काही जणांना नक्कीच कामावरून कमी केलं जाईल, असं इलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्पष्ट केलं. हे वाचा -  Nashik : कोर्स एक अन् Job च्या संधी अनेक! ‘हा’ कोर्स शिकणं काळाची गरज आहे, कसा घ्याल प्रवेश? टॅक्सी ड्रायव्हर (Taxi Driver) : सध्याच्या काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उबर किंवा ओला सेवेवर अवलंबून आहेत. यामुळे ड्रायव्हर्सना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत; मात्र येत्या 20 ते 25 वर्षांत कार्समध्ये सेल्फ ड्रायव्हिंग (Self Driving) सुविधा उपलब्ध होईल आणि त्यामुळे ड्रायव्हर्सची गरज संपुष्टात येईल, असं बोललं जात आहे. कार मेकॅनिक (Car mechanic) : ऑटोमोबाइल विश्वात टेस्लानं क्रांती केली आहे. सेल्फ ड्रायव्हिंग कार्सनी जगात एक वेगळीच कथा लिहिली आहे. येत्या काळात बहुतांश मेकॅनिक्सचं काम कम्प्युटरच करतील. याचाच अर्थ येत्या काळात गाड्या दुरुस्त करण्यासाठी कारच्या खाली काम करून हात खराब करण्याची गरज भासणार नाही. माणूस केवळ कम्प्युटरच्या माध्यमातून कार दुरुस्त करील. वेटर (waiter) : जपानमधल्या (Japan) बहुतांश हॉटेल्समध्ये ऑर्डर घेण्याचं आणि ती वितरित करण्याचं काम रोबोट्स करतात. अमेरिकेनंदेखील या दिशेने पाऊल टाकलं आहे. 2025 पर्यंत जगभरात बहुतांश फूड आउटलेट्स रोबोट्सच्या माध्यमातून चालवली जातील. हे वाचा -  अब Bollywood दूर नहीं! अभिनयाच्या क्षेत्रात आहेत करिअरच्या मोठ्या संधी; पण कसं घ्याल शिक्षण? इथे मिळेल उत्तर कॅशियर (Cashier) : सध्या बहुतांश बॅंका आणि दुकानांमध्ये कॅश काउंटरवर कामगार दृष्टीस पडतात. परंतु, लवकरच ही कामं रोबोट्सच्या माध्यमातून केली जातील. अनेक वेळा रक्कम मोजताना माणसांकडून चुका होतात. रोबोट्समुळे या चुका कमी होतील. याशिवाय 2025 पर्यंत अन्य काही जॉब्ज संपुष्टात येऊ शकतात. त्यात ब्रोकर्स, टोलबूथ ऑपरेटर, बॅंक टेलर्स, ट्रान्सलेटर्स अर्थात अनुवादक, कम्प्युटर मेकॅनिक आणि कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटटिव्ह्ज यांचा समावेश आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात