Home /News /career /

क्या बात है! 4 दिवस करा नोकरी आणि इतर 3 दिवस असेल सुटी; 'या' MNC ची कर्मचाऱ्यांना थेट ऑफर

क्या बात है! 4 दिवस करा नोकरी आणि इतर 3 दिवस असेल सुटी; 'या' MNC ची कर्मचाऱ्यांना थेट ऑफर

नसॉनिक कॉर्प (Panasonic Corp.) असं या कंपनीचं नाव आहे.

नसॉनिक कॉर्प (Panasonic Corp.) असं या कंपनीचं नाव आहे.

कंपनीनं आपल्या कर्मचार्‍यांसाठी चार दिवसीय वर्किंग वीक सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सुविधा ऑप्शनल असणार आहे.

    नवी दिल्ली, 13 जानेवारी: कुठल्याही कंपनीच्या किंवा ऑफिसच्या कामाचा उरक त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर (employees) अवलंबून असतो. आपल्याकडे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी जास्तीत-जास्त काम करावं, अशी प्रत्येक मालकाची इच्छा असते. कारण, जितकं जास्त काम केलं जाईल तितका जास्त फायदा मालकाला होतो. मात्र, जपानमधील (Japan) एक मोठी कंपनी याला अपवाद ठरली आहे. या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील तीन दिवस सुट्टी देण्याचा विचार केला आहे. पॅनसॉनिक कॉर्प (Panasonic Corp.) असं या कंपनीचं नाव आहे. जपानमध्ये 4 वर्किंग डेज कल्चर (Four Working Days Culture) अस्तित्वात आहे. या कल्चरचा स्वीकार करणाऱ्या कंपन्यांची संख्या आता हळूहळू वाढत आहे. कर्मचार्‍यांना आपलं काम आणि खासगी आयुष्य यामध्ये चांगलं संतुलन साधता यावं, या उद्देशानं हे वर्किंग कल्चर (Japan Working Culture) सुरू करण्यात आलेलं आहे. जपानमधील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या पॅनसॉनिकनंदेखील या कल्चरचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं आपल्या कर्मचार्‍यांसाठी चार दिवसीय वर्किंग वीक सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सुविधा ऑप्शनल असणार आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पॅनसॉनिक ही जपानमधील मोठी मल्टिनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स कंपनी (Electronics Company) आहे. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्यादेखील जास्त आहे. जपानमधील ओसाकामध्ये (Osaka) या कंपनीचं मुख्यालय आहे. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना वैयक्तीक आयुष्याचा विचार करून मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीनं चार दिवसांचा वर्किंग वीक केला असून सुट्टीच्या दिवशी त्यांना साइड जॉब (side Job) करण्याचीही परवानगी दिली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना कुठल्याही ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करण्याचीसुद्धा परवानगी कंपनीनं दिली आहे. गेल्या आठवड्यात इन्व्हेस्टर्ससोबत (Investers) झालेल्या एका मीटिंगनंतर कंपनीचे सीईओ युकी कुसुमी (Yuki Kusumi) यांनी याबाबत घोषणा केली. ...म्हणून भारतात वाढतंय बेरोजगारीचं प्रमाण? कंपन्यांमध्ये चीनसारखं वर्क कल्चर 'आमच्या कंपनीमध्ये असलेल्या डायव्हर्स्ड ह्युमन कॅपिटलला (कर्मचारी) सर्वोत्तम वर्क स्टाईल आणि लाईफ स्टाईल देण्याची आमची जबाबदारी आहे. त्यामुळे चार दिवस वर्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांच्या पार्टनरची दुसऱ्या लोकेशनवर ट्रान्सफर होईल त्या कर्मचाऱ्यांनासुद्धा त्याच लोकेशनवरून काम करण्याची परवानगी दिली जाईल,' अशी माहिती युकी कुसुमी यांनी दिली. जपानी लोक त्यांच्या कष्टाळू वृत्तीसाठी ओळखले जातात. अनेक लोक आठवड्याची सुट्टीदेखील घेत नसल्याचं काही वर्षांपूर्वी निदर्शनास आलं होतं. याचा नागरिकांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफवर परिणाम होत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन जपानमधील काही खासदार दोन दिवसांच्या सुट्टीसह आणखी एक दिवस अतिरिक्त सुट्टी देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करत आहेत. खासदारांचं एकमत झाल्यास जपानमध्ये तीन दिवसांच्या सुट्टीचा कायदा तयार होऊ शकतो. मात्र, काही कंपन्यांनी तीन दिवस सुट्टी देण्याच्या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केलेली आहे. 2020 मध्ये कामगार मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, फक्त 8 टक्के जपानी कंपन्या दोन दिवसांपेक्षा जास्त सुट्ट्या देण्यास तयार आहेत. फोर वर्किंग डेज वीक देणारी पॅनसॉनिक ही काही जगातील पहिलीच एमएनसी नाही. यापूर्वी 2018 मध्ये अमेझॉननं देखील (Amazon.com Inc) प्रायोगिक तत्त्वावर निवडक कर्मचाऱ्यांसाठी 'फोर वर्किंग डेज' फॅसिलिटी सुरू केली होती. याशिवाय विविध ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणाऱ्या युनिलिव्हर पीएलसी (Unilever Plc) या कंपनीनं डिसेंबर 2020 मध्ये न्यूझीलंडमधील आपल्या कर्मचार्‍यांसाठी चार दिवसांचा वर्किंग वीक केला होता. त्यांनी एका वर्षासाठी हा प्रयोग करून पाहिला होता. एका रिपोर्टनुसार कोविड-19च्या ट्रीटमेंटसाठी ओरल मेडिसिन तयार करणारी Shionogi & Co ही कंपनी येत्या एप्रिल महिन्यापासून आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील तीन दिवस सुट्टी (Weekly Off) देणार आहे. या व्यतिरिक्त आयर्लंड, आइसलँडसारख्या देशांमध्येही चार दिवसांचा वर्किंग वीक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
    First published:

    Tags: Career, World news

    पुढील बातम्या