Home /News /career /

देशात कोरोनाची तिसरी लाट! वर्क फ्रॉम होम पुन्हा वाढणार? काय असेल कंपन्यांचा निर्णय? वाचा

देशात कोरोनाची तिसरी लाट! वर्क फ्रॉम होम पुन्हा वाढणार? काय असेल कंपन्यांचा निर्णय? वाचा

कंपन्या यापुढे नक्की कुठली पावलं उचलतात हेच बघणं महत्त्वाचं

कंपन्या यापुढे नक्की कुठली पावलं उचलतात हेच बघणं महत्त्वाचं

कोरोनाचा नायनाट होणार ही स्वप्नं बघणाऱ्या सामान्य नागरिकांमध्येही यामुळे दहशत निर्माण झाली आहे. त्यात आता महाराष्ट्रात परत लॉकडाऊन लावण्याचा विचार केला जात आहे.

    मुंबई, 04 जानेवारी: गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानं संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतातही पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली आहे. मात्र आता Omicron नावाच्या कोरोनाच्या व्हेरिएन्टनं (Omicron cases India) जगभरातील लोकांमध्ये पुन्हा दहशत निर्माण केली आहे. कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये (Work from Office) बोलावण्याचा तयारीत असलेल्या कंपन्यांना आता या Omicron मुळे निर्णय मागे घ्यावा लागतोय की काय अशी चिंता वाटू लागली आहे. तर आता सर्वकाही सुरळीत होणार आणि कोरोनाचा नायनाट होणार ही स्वप्नं बघणाऱ्या सामान्य नागरिकांमध्येही यामुळे दहशत निर्माण झाली आहे. त्यात आता महाराष्ट्रात परत लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लावण्याचा विचार केला जात आहे. देशभरात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे देशात कोरोनची तिसरी लाट (Third wave of Corona) आली आहे हे स्पष्ट करण्यात आलं आहे. पुन्हा वर्क फ्रॉम होम बंद करून पुन्हा ऑफिस सुरु करू इच्छिणाऱ्या कंपन्यांनी आता दोन पावलं मागे घेतली आहेत. देशासह राज्यात पुन्हा ऑफिसेस सुरु होणार की नाही हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणारच आहे. केंद्र सरकारनंही सरकारी ऑफिसमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियमावली (New corona rules for Government employees) जाहीर केली आहे. त्यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही पन्नास टक्के उपस्थितीमध्ये ऑफिसमध्ये येण्यास संगणयत आलं आहे. Mass Communication करावं की Journalism? या दोघांमध्ये फरक आहे तरी काय? वाचा मुंबई, पुणे आणि नागपूर या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. मुंबईत तर कोरोना रुग्णांनी दहा हजारांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे पुन्हा सुरु होण्याच्या तयारीत असलेले ऑफिस पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काही कंपन्या हायब्रीड मॉडेलवर काम करत होत्या मात्र आता त्याही परत वर्क फ्रॉम होमच्या निर्णयावर ठाम आहेत. Infosys, HCL, Tech Mahindra सारख्या भारतातील IT कंपन्या Omicron Covid-19 प्रकाराबाबत अनिश्चिततेमध्ये कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत कधी बोलावू शकतील हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाहीये. Deloitte आणि Mindtree सारख्या कंपन्या ज्या कथितपणे त्यांची ऑफिसेस उघडण्याची योजना आखत होत्या त्या भारतात Omicron रुग्णांची संख्या वाढल्यानंतर आता संभ्रमात आहेत. कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावून त्यांचा जीव धोक्यात घालण्याची रिस्क कोणीही घेऊ इच्छित नाही. जर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागलं तर निश्चितपणे सर्व कंपन्या वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडणार आहेत. आता कर्मचारी आणि कंपन्या यापुढे नक्की कुठली पावलं उचलतात हेच बघणं महत्त्वाचं असणार आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या