जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / काय सांगता! तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे बऱ्याच लोकांना गमवावी लागणार नोकरी; 'या' नोकऱ्या येतील कायमच्या संपु्ष्टात?

काय सांगता! तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे बऱ्याच लोकांना गमवावी लागणार नोकरी; 'या' नोकऱ्या येतील कायमच्या संपु्ष्टात?

असे राहा बिनधास्त

असे राहा बिनधास्त

जी कामं पूर्वी माणूस करत होता, त्यापैकी अनेक कामं आता यंत्राद्वारे केली जात आहेत. यामुळे आगामी काळात काही क्षेत्रांतल्या नोकऱ्याही जवळपास संपुष्टात येतील, असं बोललं जात आहे.

    मुंबई, 12 जुलै:  गेल्या काही वर्षांत प्रगत तंत्रज्ञानामुळे (Technology) अनेक गोष्टी बदलल्या आहेत. पूर्वी एखाद्या मित्राशी, नातेवाईकाशी किंवा बाहेरगावी असलेल्या कुटुंबातल्या सदस्यासोबत बोलण्यासाठी एसटीडी बूथवरून जाऊन फोन कॉल करावा लागत होता; पण आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने हा संवाद सहज शक्य झाला आहे. एकीकडे तंत्रज्ञानामुळे आपल्या रोजच्या जीवनात अनेक गोष्टी सुसह्य झाल्या आहेत. परंतु, वाढत्या यांत्रिकीकरणामुळे (Mechanization) नोकऱ्यांची (Jobs) संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊ लागली आहे. जी कामं पूर्वी माणूस करत होता, त्यापैकी अनेक कामं आता यंत्राद्वारे केली जात आहेत. यामुळे आगामी काळात काही क्षेत्रांतल्या नोकऱ्याही जवळपास संपुष्टात येतील, असं बोललं जात आहे. याचा वेध घेणारी माहिती देणारं वृत्त `एनडीटीव्ही`ने प्रसिद्ध केलं आहे. तंत्रज्ञानामुळे आपलं जीवन (Life) आमूलाग्र बदललं असलं, तरी यामुळे येत्या दहा वर्षांत नोकऱ्यांचा प्रश्न नक्कीच गंभीर होऊ शकतो. प्रत्येक क्षेत्रात यंत्रांचा वापर वाढत आहे. परिणामी मनुष्यबळाची (Manpower) गरज कमी होऊ लागली आहे. त्यामुळे येत्या काळात बेरोजगारी वाढणार आहे. इतकंच नाही, तर सुमारे दहा क्षेत्रांतल्या नोकऱ्या जवळपास संपुष्टात येतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. प्राध्यापकांनो, नोकरी हवीये? मग परीक्षा देण्याची गरज नाही; थेट द्या Interview

    स्मार्टफोन ही गरजेची वस्तू बनली आहे. स्मार्टफोन आपल्यासाठी पर्सनल सेक्रेटरीची (Personal Secretary) भूमिका बजावतो. कोणे एके काळी बॉसला कामाची आठवण करून देण्याचं काम ऑफिसमधले सेक्रेटरी करत. आता या सेक्रेटरीची जागा स्मार्टफोननं घेतली आहे. आगामी काळात पर्सनल सेक्रेटरीची गरज संपल्यात जमा असेल. त्यामुळे नोकरीची ही संधी संपुष्टात येईल.

    टोल प्लाझा ऑपरेटरच्या (Toll Plaza Operator) बाबतीतही वेगळी स्थिती नाही. हळूहळू ऑटोमेशनवर भर वाढत आहे. आता बहुतांश जण डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून पेमेंट करत आहेत. त्यामुळे टोल नाक्यावरच्या ऑपरेटरची गरज कमी झाली आहे. येत्या काळात ऑटोमेशनमुळे हे पद नोकरीच्या यादीतून बाहेर जाईल. बातम्या वाचण्यासाठी वाचकांचा ऑनलाइन माध्यमांकडे कल वाढत आहे. त्यामुळे वृत्तपत्र व्यवसाय मंदीकडे वाटचाल करत आहे. परिणामी प्रिंट मीडियाचे (Print Media) पत्रकार आणि त्याच्याशी संबंधित अन्य घटकांची नोकरी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आगामी काळात या क्षेत्रातल्या नोकऱ्या संपुष्टात येतील असं दिसून येतं. अनेक जण स्मार्टफोन किंवा टॅबवर पुस्तकं वाचण्यास प्राधान्य देत आहेत. ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्स अगदी सहज उपलब्ध होत आहेत. ग्रंथालयांमध्ये (Library) पुस्तकं शोधून काढण्यासाठी रोबोट्सची मदत घेतली जाऊ लागली आहे. त्यामुळे ग्रंथालयांमध्ये पूर्वीइतकी मनुष्यबळाची गरज राहिलेली नाही. येत्या काळात डिजिटलायझेशनमुळे ग्रंथपाल आणि ग्रंथालयातले कर्मचारी ही पदंही संपुष्टात येऊ शकतील. बीपीओ आणि कॉल सेंटर इंडस्ट्रीत ऑटोमेशनमुळे बीपीओ कर्मचाऱ्यांची (BPO Worker) गरज कमी होऊ लागल्याची चर्चा आहे. प्रत्येक कंपनी हळूहळू चॅटबॉट्सचा वापर करण्यावर भर देत आहे. त्यामुळे येत्या काळात बीपीओ कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते. ई-मेल, मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप आणि स्काइपसारख्या अनेक अ‍ॅप्समुळे काही क्षणांत मेसेज पोहोचवणं सोपं झालं आहे. यामुळे पोस्टमन (Postman) आणि कुरियर कंपन्यांचं काम कमी होत चाललं आहे. येत्या काळात या दोन्हींची गरज अजून कमी होण्याची शक्यता आहे. भविष्यात मानवरहित फायटर जेट्सचं महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे फायटर पायलटचा (Fighter pilot) जॉबही अडचणीत येऊ शकतो. बसमध्ये आता हळूहळू मशीन्सचा वापर करण्याची तयारी सुरू आहे. ही मशीन्स कंडक्टरचं (Conductor) काम करतील. त्यामुळे पुढच्या काळात बसमध्ये कंडक्टरची गरज भासणार नाही. प्रवासी मशीनच्या मदतीनं तिकीट मिळवू शकणार आहेत. Indian Army मध्ये भरती व्हायचंय ना? मग द्या NDA परीक्षा; इथे मिळेल A-Z माहिती

    ऑटोमेशनमुळे पार्किंग लॉट अटेंडेंटची (Parking Lot Attendant) नोकरीही संपुष्टात येऊ शकेल. भविष्यात काळात पार्किंग प्लाझा ऑटोमेटेड होतील.

    एकूणच तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणामुळे अनेक गोष्टी सोप्या होतील; पण दुसरीकडे अनेक क्षेत्रांतल्या नोकरीच्या संधी संपुष्टात येतील हे नक्की.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात