मराठी बातम्या /बातम्या /करिअर /आता शिक्षणासोबतच कमवा पैसेही; 'हे' आहेत टॉप पार्ट टाइम जॉब्स; मिळेल भरघोस पगार

आता शिक्षणासोबतच कमवा पैसेही; 'हे' आहेत टॉप पार्ट टाइम जॉब्स; मिळेल भरघोस पगार

चला तर मग जाणून घेऊया टॉप पार्ट टाइम जॉब्सबद्दल.

चला तर मग जाणून घेऊया टॉप पार्ट टाइम जॉब्सबद्दल.

चला तर मग जाणून घेऊया टॉप पार्ट टाइम जॉब्सबद्दल.

मुंबई, 10 जुलै: आई-वडील आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी (Education) लाखो रुपये खर्च करतात. याचं कारण म्हणजे शाळा आणि कॉलेजेसचं वाढलेलं शुल्क (Fee of schools and Colleges). हे शुल्क भरता  भरता गरीब कुटुंबातील पालकांची दमछाक होते. त्यात पैसे नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. मात्र काही होतकरू विद्यार्थी यातून मार्ग काढत शिक्षणासोबतच नोकरी करण्याचा पर्याय (Education with jobs) निवडतात. पण पार्ट टाइम नोकरी (Part Time Jobs) करावी तरी कोणती? कोणती नोकरी केल्यामुळे पैसे जास्त मिळू शकतील? असे प्रश्न विद्यार्थ्यंना पडत्तात. याच सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया टॉप पार्ट टाइम जॉब्सबद्दल.

Coffee किंवा TEA शॉप

आजकाल बरेच हाय प्रोफाइल कॉफी शॉप्स (Coffee Shops) आणि टी शॉप्स लोकप्रिय आहेत. अशा ठिकाणी काम करण्याचं विद्यार्थ्यांचं प्रमाणही वाढलं आहे. अशा ठिकाणी फक्त 5 ते 6 तासांच्या शिफ्टमध्ये काम करून 6000 ते 10000 रुपये मिळवता येतात. त्यामुळे हा पार्ट टाइम जॉबचा एक उत्तम पर्याय आहे.

पिझ्झा डिलिव्हरी

कोणत्याही पिझ्झा शॉपमध्ये तुम्ही पिझ्झा डिलिव्हरी पार्टनर (Pizza delivery Partner) म्हणून नोकरी शकता. 5 ते 6 तासांची शिफ्ट केल्यास तुम्ही 5000 ते 8000 रुपये मिळवू शकता.

हे वाचा - Interview वेळी पगाराबद्दल बोलताना चुकूनही करू नका ही कामं; अन्यथा जाईल नोकरी

रिसेप्शनिस्ट

खाजगी कार्यालय, रुग्णालय किंवा कंपनीमध्ये पार्ट टाइम रिसेप्शनिस्ट (Receptionist) म्हणून काम करण्यासाठी तुम्हाला 3000 ते 8000 रुपये मिळू शकतात. यासाठी आपल्याला 4 ते 5 तास द्यावे लागतील.

कॉल सेंटर जॉब्स

आजकाल तरूणांमध्ये सर्वात कॉल सेंटरची जास्त क्रेझ आहे. कॉल सेंटरमध्ये (Call center jobs) डेटा एन्ट्रीचं कामही केलं जातं. यात वेगवेगळ्या वेळा असतात ज्यात रात्रीच्या वेळीही काही शिफ्ट होतात. हे काम घरी बसून देखील करू शकता. या कामासाठी 2 ते 6 तास द्यावे लागतील यासाठी 4000 ते 12000 रुपये मिळू शकतात.

First published:

Tags: Career opportunities, Education, Jobs