जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / तरुणांनो, नोकरी शोधताय? मग 'या' टॉप जॉब सर्चिंग अप्लिकेशन्स मोबाईलमध्ये आहेत ना? लगेच करा डाउनलोड

तरुणांनो, नोकरी शोधताय? मग 'या' टॉप जॉब सर्चिंग अप्लिकेशन्स मोबाईलमध्ये आहेत ना? लगेच करा डाउनलोड

तरुणांनो, नोकरी शोधताय? मग 'या' टॉप जॉब सर्चिंग अप्लिकेशन्स मोबाईलमध्ये आहेत ना? लगेच करा डाउनलोड

आज आम्ही तुम्हाला अशा काही मोबाईल अप्लिकेशन्सबद्दल (Top Job searching Apps) सांगणार आहोत ज्या तुमच्या मोबाईलमध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 ऑगस्ट: कोरोनामुळे (Corona Virus) संपूर्ण मार्केटवर आर्थिक परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकरी गेल्या आहेत. तर फ्रेशर्सना नोकरी (Latest jobs for Freshers) शोधण्यात अडचणी येत आहेत. काही जण ओळखीच्या भरवश्यावर तर काही जण वणवण फिरून नोकरी शोधत (Job search) आहेत. त्यात कॉलेजच्या फायनल इयरला येणाऱ्या कॅम्पसचं (Campus placement) प्रमाणही कमी झाल्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. अशावेळी मात्र ऑनलाईन जॉब सर्चिंग प्लॅटफॉर्म्स (Best Online Job Searching Platforms) सुरु झाले आहेत. ज्यावर जगभरातील कोणत्याही जॉबबद्दल माहिती मिळू शकते. म्हणूनच जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही मोबाईल अप्लिकेशन्सबद्दल (Top Job searching Apps) सांगणार आहोत ज्या तुमच्या मोबाईलमध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया. LinkedIn LinkedIn हे अप्लिकेशन अनेकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे वाटू शकतं. मात्र LinkedIn असं अजिबात नाही. इथे जॉब शोधण्याच्या सोबतच तुम्ही काम करू इच्छिणाऱ्या कामाच्या मोठ्या पदावरच्या व्यक्तींबरोबर संवाद साधता येतो. तसंच इथे निरनिराळ्या कंपन्या जॉब्स पोस्ट करत असतात. त्यामुळे इथे जाऊन तुम्हाला जॉबसाठी अप्लाय करणं सोपं असतं. तसंच तुमच्यातील काही स्पेशल स्किल्स, तुमचं शिक्षण याबद्दल तुम्ही अपडेट करत राहू शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार चांगला जॉब मिळू शकेल. Naukari.com Naukari.com ही एक स्वतंत्र जॉब सर्चिंग वेबसाईट आहे तसंच या वेबसाईटची अप्लिकेशनही उपलब्ध आहे. इयथे जगभरातील जॉब्स पोस्ट होत असतात. त्यामुळे तुम्हाला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात नोकरी हवी असेल तर मिळू शकते. विशेष म्हणजे इथे तुमच्या शिक्षणानुसार आणि जॉब टायटलनुसार नोकरी शोधण्याची मुभा असते. त्यास्तही तुंहाला तुमचा ई-मेल आयडी आणि संपूर्ण बायोडेटा इथे अपलोड करावा लागतो. यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यास सुरुवात होते. Indeed Naukari.com प्रमाणेच Indeed हे सुद्धा जॉब सर्चिंग अप्लिकेशन आहे ज्यामध्ये तुम्ही सोप्या पद्धतीनं जॉब्स शोधू शकता. तुमचा बायोडेटा अपलोड केल्यानंतर तुमच्यातील स्किल्सनुसार तुम्हाला जॉब्सच्या नोटिफिकेशन्स मिळतात. एकदा जॉबसाठी अप्लाय केल्यानंतर तुमची अप्लिकेशन आवडल्यास कंपनीकडून तुम्हाला मुलाखतीचा कॉल येतो. ही एक वापरण्यास सोपी अशी अप्लिकेशन आहे. Monster.com Monster.com ही जॉब सर्चिंग वेबसाईट अप्लिकेशन आहे. इथे तुम्हाला सरकारी आणि खासगी असे दोनही प्रकारचे जॉब्स बघायला मिळतात. इथेही आपला बायोडेटा अपलोड करून तुम्ही जॉबचे नोटिफिकेशन्स मिळवू शकता. वरील काही वेबसाईट्स आणि अप्लिकेशन्सवर रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावं लागू शकतं. त्यामुळे उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करताना काळजीपूर्वक रजिस्टर करावं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात