जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Job Alert! पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांना TCS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 7.3 लाखांपर्यंत मिळेल पगार

Job Alert! पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांना TCS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 7.3 लाखांपर्यंत मिळेल पगार

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ऑफ-कॅम्पस ड्राइव्ह

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ऑफ-कॅम्पस ड्राइव्ह

आयटी क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी (Jobs in IT Sector) चांगली बातमी आहे. टीसीएसने नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जदारांना थोडा अनुभव असणं आवश्यक असेल. पगारदेखील चांगला दिला जाणार आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 12 फेब्रुवारी: आयटी क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी (Jobs in IT Sector) चांगली बातमी आहे. टीसीएसने नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जदारांना थोडा अनुभव असणं आवश्यक असेल. पगारदेखील चांगला दिला जाणार आहे. टीसीएसने (TCS Jobs) ज्या जागांसाठी अर्ज मागवले आहेत, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services TCS) ‘ऑफ-कॅम्पस डिजिटल हायरिंग’ (Off-Campus Digital Hiring) कार्यक्रमासाठी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सकडून (engineering graduates job) अर्ज मागवत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी आहे. उमेदवारांना ऑनलाइन टेस्ट आणि मुलाखतीसाठी (online test and personal interview) हजर राहावं लागेल आणि कंपनीकडून लवकरच त्या तारखा जाहीर केल्या जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. ‘बिझनेस इनसायडर’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार पगार मिळेल. पदवीधरांना वार्षिक 7 लाख रुपयांचं पॅकेज मिळेल, तर ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन (post-graduation) म्हणजेच मास्टर्स झालंय, त्यांना वार्षिक 7.3 लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. हे वाचा- सावधान! ऑफिसमधील तुमच्या Shyness मुळे धोक्यात येऊ शकतं करिअर; या टिप्स वाचा या नोकरीसाठी पात्रतेच्या अटी - तुम्ही जर टीसीएसमध्ये अ‍ॅप्लाय करण्याचा विचार करत असाल तर या पात्रतेच्या अटी आधी वाचून घ्या. बॅचलर किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech) किंवा (M.Tech)/बॅचलर किंवा मास्टर ऑफ इंजिनीअरिंग (BE) किंवा (ME)/ मास्टर ऑफ कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (MCA)/ मास्टर ऑफ सायन्स (M.Sc) यांपैकी कोणतीही पदवी मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठामधून प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 2019, 2020, 2021 मध्ये पदवी प्राप्त केलेले अर्ज करण्यास पात्र असतील. - अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आयटी क्षेत्रात किमान 6 ते 12 महिन्यांचा कामाचा अनुभव असावा, ही एक महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे. - याशिवाय उमेदवारांनी इयत्ता 10वी, 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये किमान 70% एकूण गुण मिळवलेले असावेत. - उमेदवारांचा कोणताही बॅकलॉग नसावा. त्यांनी निर्धारित अभ्यासक्रम दिलेल्या कालावधीत पूर्ण केलेला असावा. - सर्व उमेदवारांना शिक्षणात गॅप (gaps in education) असेल तर जाहीर करणं बंधनकारक आहे. शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकूण गॅप 24 महिन्यांपेक्षा जास्त नसावा, असं नमूद करण्यात आलं आहे. हे वाचा- तब्बल 50 मुलाखतीनंतर तरुणीला गुगलमध्ये मिळाली नोकरी; पॅकेज बघून व्हाल थक्क - तसंच उमेदवारांचे केवळ फुल टाइम कोर्सेस (full-time courses) गृहीत धरले जातील आणि त्यांचा विचार केला जाईल. अर्धवेळ (part time) / किंवा इतर कोणतेही अभ्यासक्रम ग्राह्य धरले जाणार नाहीत. निवड प्रक्रिया कशी असेल उमेदवारांची निवड कंपनीद्वारे आयोजित दोन राउंड्सच्या आधारे केली जाईल. पहिली ऑनलाइन लेखी परीक्षा (Online written test) आणि दुसरी म्हणजे मुलाखत. लेखी परीक्षा रिमोट पद्धतीने घेतली जाईल आणि त्यात advanced quantitative aptitude (40 minutes), verbal ability (10 min), advanced coding (60 min) या विभागांचे प्रश्न असतील. TCS प्रोग्रामसाठी अर्ज कसा करावा? या प्रोग्रामसाठी उमेदवारांना एक ऑनलाइन अर्ज (https://nextstep.tcs.com/campus/#/) भरावा लागेल. तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर, ‘डिजिटल ड्राइव्ह’साठी येथे अर्ज करा’ (apply for the ‘Digital Drive’ here) ही एक महत्त्वाची स्टेप पूर्ण करावी लागेल. (https://g91.tcsion.com/FeedbackSolution/openPublishURL.do?publishKey=o6NNCwyBYwiiYXzkp5HSQN%2B%2FvQ3TRu0rA47Xas2Kwec%3D) एकाच उमेदवाराने अनेक वेळा अर्ज केल्यास ते अपात्र ठरतील, असंही सांगण्यात आलं आहे. तुम्ही या नोकरीसाठी पात्र असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर वर दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही अर्ज करू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात