मुंबई, 01 डिसेंबर: भारतातील नामांकित आणि सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना (Freshers and Professionals jobs in tcs) कॉर्पोरेट सेक्टरमधील ट्रेनिंग मिळावं म्हणून Certification Program (TCS Certification Program) लाँच केला आहे. उमेदवारांना पर्सनॅलिटी आणि करिअरबद्दल गोष्टींचं ज्ञान देण्यासाठी आणि उमेदवारांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हा Free सर्टिफिकेशन कोर्स (TCS free certification course) आणला आहे. “TCS iON Career Edge’ असं या सर्टिफिकेशन कोर्सचं (TCS iON Career Edge) नाव असणार आहे. जाणून घेऊया या कोर्सबद्दलच्या काही डिटेल्स.
आज नोकरीचा बाजार आव्हानांनी भरलेला आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक स्पर्धात्मक आहे, ज्यामुळे तरुणांना विजयासाठी त्यांचे सर्वोत्तम पाऊल पुढे टाकावे लागते. चातुर्याने वापरल्यास हा काळ त्यांच्यासाठी स्वयंपरिवर्तनाचा टप्पा ठरू शकतो.
तरुणांना फायदेशीरपणे रोजगार मिळवून देण्यासाठी संवाद, सहयोग, व्यावसायिक शिष्टाचार, आर्थिक आणि डिजिटल साक्षरता कौशल्ये यासारख्या मुख्य रोजगार कौशल्यांनी सुसज्ज करणे ही काळाची गरज आहे म्हणूच या कोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा 15 दिवसांचा कोर्स नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या मुख्य रोजगार कौशल्य जसे की संवाद, सहयोग, व्यावसायिक शिष्टाचार, आर्थिक आणि डिजिटल साक्षरता सुधारण्यास मदत करेल. यंग प्रोफेशनल हा 15-दिवसीय करिअर तयारीचा विनामूल्य प्रवेश अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये 14-मॉड्यूल आहेत जे तुम्ही 2 आठवड्यांत शिकू शकाल.
IT क्षेत्रात करिअर करायचंय? मग 'या' टॉप Programming Languages शिकणं महत्वाचं
कोर्समध्ये काय शिकवणार
CS iON Career Edge हा 15-दिवसीय करिअर तयारी कोर्स अंतर्गत, तुम्हाला काही स्किल्स शिकवल्या जाणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया हा कोर्स केल्यानंतर तुम्ही काय शिकू शकाल.
कामाच्या ठिकाणी स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी वर्तणूक कौशल्ये.
प्रभाव निर्माण करण्यासाठी सादरीकरण आणि कम्युनिकेशन स्किल्स.
मजबूत प्रोफाइल बनवण्यासाठी प्रभावी रेझ्युमे कसा तयार करावा
कॉर्पोरेट सेटिंगमध्ये योग्य corporate setting
अकाउंटिंग आणि ITची मूलभूत तत्त्वे
Artificial Intelligence ची संकल्पना
या उमेदवारांना करता येणार अप्लाय
हा अभ्यासक्रम घेण्यासाठी कोणत्याही पूर्व शर्ती नाहीत. अंडरग्रेजुएट, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आणि फ्रेशर्स या ऑनलाइन कोर्ससाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे तुम्हालाही कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असेल तर हा कोर्स म्हणजे पर्वणीच ठरणार आहे.
TCS iON Career Edge प्रोग्रॅमसाठी रजिस्टर करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, TCS chairman, जॉब