मुंबई, 12 जानेवारी : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षांचे निकाल काही दिवसांपूर्वीच लागले. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करत यश मिळवलं आहे. मुंबईची रुपाली तुकाराम कापसे ही अशीच एक यशस्वी उमेदवार आहे. गरीब कुटुंबातील रूपाली आता उद्योग निरिक्षक म्हणून काम करणार आहे. बारावीमध्येच ध्येय निश्चित रुपालीनं या यशस्वी प्रवासाचं रहस्य सांगितलं आहे. ‘मी बारावीला असतानाच स्पर्धा परीक्षा देण्याचं नियोजन केलं होतं. पदवीच्या शेवटच्या वर्षी अभ्यासाला सुरूवात केली. सुरुवातीला मला कुणाचंही मार्गदर्शन नव्हतं. त्यातच दोन वर्ष कोरोना होता. त्यामुळे या काळात स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत. हा माझ्यासाठी संघर्षाचा काळ होता.’ ‘अडचणी प्रत्येकालाच असतात’ ‘आर्थिक अडचणी प्रत्येकालाच असतात. मात्र, त्या अडचणींना आपण कवटाळून ठेवायचं की त्या अडचणींवर मात करून पुढे जायचं हे आपल्या हातात असतं. मला सुद्धा काही आर्थिक अडचणी होत्या. मात्र मी त्यांचा फार काही बाऊ केला नाही. माझी आई घरकाम करते तर वडील मजुरी करतात ते रंगकाम करतात. कोण म्हणतं नोकरी करताना MPSC चा अभ्यास होत नाही? हा घ्या सरकारी अधिकारी होण्याचा गुरुमंत्र मी या अडचणींवर मात करून पुढे जायचं ठरवलं. मी चुनाभट्टी सारख्या परिसरामध्ये राहते. एका छोट्या चाळीत आमचं घर आहे. एका छोट्याशा घरात आमचं कुटुंब राहतं. मी ज्या ग्रंथालयामध्ये अभ्यास केला ते ग्रंथालय देखील फक्त दहा बाय दहाच आहे. त्यामुळे अडचणी बऱ्याच आल्या पण माझे ध्येय फिक्स होतं. अभ्यास केला, वाचन केलं आणि मी आज एक अधिकारी म्हणून तुमच्यासमोर आहे,’ असं रुपाली यावेळी म्हणाली. अभ्यास करत काम रुपालीनं आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं काम करत अभ्यास केला. ‘मी बीटेकला असताना आम्हाला स्टायपेंड मिळायचा. त्यावेळी त्या पैशांवर माझं थोडफार भागत होतं. त्यानंतर मी राज्य महिला आयोगात एक उपक्रमावर ट्रेनी म्हणून रुजू झाले. तिथून मला काही मानधन म्हणून थोडेफार पैसे मिळायला लागले. या मिळणाऱ्या पैशावर मी माझा आर्थिक खर्च भागवला. माझा अभ्यास सुरूच होता. आमचा डिजिटल लिट्रसीचा प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्ट मधून मिळणाऱ्या मानधनावर दोन वर्ष माझं घर चाललं. पण, आता मागची सहा महिने आम्ही खूप वाईट परिस्थितीतून जातोय,’ असा अनुभव रुपालीनं सांगितला.
कंटाळवाणं जगू नका तुम्ही अनेक अधिकाऱ्यांच्या यशोगाथा ऐकल्या असतील. अनेक अधिकारी सांगतात मी १६ तास अभ्यास केला, १८ तास अभ्यास केला, रात्र जागून अभ्यास केला. या अभ्यास करण्यात ते त्यांचं आयुष्य काय जगले हे मात्र विसरून जातात. अभ्यास करणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य जगणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, असं रूपाली सांगते. STI Exam : बीडचा शुभम राज्यात पहिला, पाहा 4 वर्षांच्या परिश्रामानंतर कसं मिळलं यश? Video ‘मी कंटाळा येईल इतका अभ्यास कधीच केला नाही. माझं जवळपास पूर्ण शिक्षणाच गावाकडे झाल्यामुळे मी कधी शेतात जाऊन अभ्यास केला, कधी बागेत जाऊन अभ्यास केला आहे. मी घरातील सर्व काम सांभाळून अभ्यास करत असे. त्यामुळे इतरांप्रमाणे दहा ते बारा तास अभ्यास नाही केला. पण, गरजेपुरता करायचे आणि जेव्हा परीक्षा जाहीर व्हायच्या त्यावेळी थोडा अभ्यास वाढवायचे, ’ असं रुपाली यावेळी म्हणाली.