मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Shlok Srivastava: 8 लाख पगाराची नोकरी सोडून सुरु केलं YouTube चॅनेल; आता आहे Technological Inspiration

Shlok Srivastava: 8 लाख पगाराची नोकरी सोडून सुरु केलं YouTube चॅनेल; आता आहे Technological Inspiration

श्लोक श्रीवास्तव

श्लोक श्रीवास्तव

Life@25: श्लोकची युट्युब जर्नी नक्की सुरु झाली तरी कशी? यश मिळवण्यासाठी त्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं हे जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 सप्टेंबर: आजच्या मॉडर्न युगात टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात अनेक मोठे इन्व्हेंशन होत आहेत. अगदी मोठ्या मशिन्सपासून तर आपल्या हातातील स्मार्ट वॉचपर्यंत टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात प्रगती होतच चालली आहे. यात अशी काही टेक्नॉलॉजी आहे सामान्य लोकांच्या ज्ञानापलीकडची आहे. अनेकांना टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात होतंय काय घडतंय हे ही माहिती नसतं. जगभरात कोणते नवीन प्रॉडक्ट्स येत आहेत हे कळू शकत नाही. मात्र एक असा युट्युबर आहे ज्यानं या मास्टरकी मिळवली आहे. अवघ्या 28 वर्षांच्या वयात त्यानं टेक्नॉलॉजिकल इन्स्पिरेशन म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

हो. आम्ही बोलत आहोत 'Tech Burner' या नावाने युट्युब चॅनेल चालवणाऱ्या 'श्लोक श्रीवास्तव' याच्याबद्दल. आता Tech Burner हे युट्युब चॅनेल किंवा श्लोकचे भन्नाट व्हिडीओज कोणी बघितले नसतील असं होऊच शकत नाही. स्मार्टफोन असो किंवा ईकॉमर्स वेबसाईट्सवर मिळणारे आगळेवेगळे प्रॉडक्ट्स असो Tech Burner चॅनेलनं तरुणाईला अक्षरशः वेड लावलं आहे.

आता तुम्ही म्हणाल टेक्नॉलॉजी आणि गॅजेट्स चे review देणारे असे अनेक चॅनेल्स आहेत तर श्लोकमध्ये असं काय खास आहे? विशेष हे आहे की श्लोकनं फार कमी वयात इतकं यश मिळवलं आहे. प्रॉडक्ट कोणतंही असो त्याबद्दलचे Review देण्याची पद्धत लोकांना वेगळी वाटते म्हणून Tech Burner चे लाखोंमध्ये स्बस्क्राइबर आहेत. पण श्लोकची युट्युब जर्नी नक्की सुरु झाली तरी कशी? यश मिळवण्यासाठी त्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं हे जाणून घेऊया.

श्लोकचा जन्म 1995 साली नवी दिल्लीत झाला. एका सामान्य कुटुंबात जन्माला आल्यामुळे श्लोककडे सर्व गॅजेट्स तर नव्हते. मात्र लहानपणापासूनच त्याला तंत्रज्ञान आणि मोबाईल आणि लॅपटॉपसारख्या गॅजेट्समध्ये खूप रस होता. पण सुरुवातीला, श्लोकच्या पालकांनी त्याला गॅजेट्स दिले नाहीत कारण त्याने फक्त त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे अशी त्यांची इच्छा होती. दहावीपासूनच श्लोकने व्हिडिओ तयार करून ते यूट्यूबवर अपलोड करण्यास सुरुवात केली. त्याने मोटो जी स्मार्टफोनपासून सुरुवात केली आणि नंतर, त्याचे YouTube चॅनेल व्यवस्थापित करण्यासाठी Samsung Galaxy Y स्मार्टफोन वापरण्यास सुरुवात केली. त्याने वडिलांचा लॅपटॉपही वापरला.

त्या काळात, त्याचे व्हिडिओ योग्य नसल्यामुळे, त्याच्या मित्रांनी त्याला YouTube वर व्हिडीओ टाकू नको म्हणून सल्ला दिला. मात्र श्लोकला व्हिडिओ तयार करण्याची प्रक्रिया आवडली म्हणून त्याने हार मानली नाही आणि व्हिडिओ तयार करणं सुरूच ठेवलं. काही काळानंतर श्लोकला त्याच्या युट्युब चॅनेलसाठी तब्बल $90 मिळाले त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. मात्र काही काळानंतर कॉपीराईटमुळे त्यांचं चॅनेल बंद करण्यात आलं.

कशी सुरु झाली YouTube जर्नी

2014 मध्ये, श्लोक बीटेक आयटी (माहिती तंत्रज्ञान) चा अभ्यास करण्यासाठी चेन्नईच्या SRM विद्यापीठात दाखल झाला. कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना, त्याने Tech Burner नावाने एक YouTube चॅनेल सुरू केलं. सुरुवातीला, श्लोकचे संभाषण कौशल्य चांगले नव्हते परंतु कालांतराने तो सुधारत गेला. मात्र पहिल्या चार वर्षांत, श्लोक नियमितपणे व्हिडिओ पब्लिश करत नसल्यामुळे टेक बर्नर चॅनेल वेगानं वाढलं नाही. तो त्याच्या YouTube चॅनेलबद्दल गंभीर नसल्यामुळे, तो दर आठवड्याला फक्त एक व्हिडिओ अपलोड करायचा आणि यामुळे त्याचे चॅनल अपेक्षेप्रमाणे वाढले नाही. तसंच त्या काळात श्लोककडे व्हिडिओ तयार करण्यासाठी चांगले गॅजेट्स नव्हते. मात्र यानंतर श्लोकनं कधीच मागे वळून बघितलं नाही.

अभियांत्रिकी संपेपर्यंत, श्लोकला एका डिझाईन कंपनीत ₹8 लाख वार्षिक पॅकेजसह चांगली नोकरी ऑफर करण्यात आली. पण त्याने ती नोकरी नाकारली आणि YouTube वर पूर्णवेळ करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात, श्लोकचे Tech Burner वर फक्त 2,000 सदस्य होते पण त्याला त्याच्या चॅनलच्या वाढीबद्दल खूप विश्वास होता.

पहिल्या चार वर्षांत टेक बर्नरची वाढ प्रभावी नव्हती. पण एकदा श्लोकचे 10,000 सबस्क्राइबर्स झाले आणि त्याचं चॅनल झपाट्याने वाढलं. आता, श्लोककडे 20 लोकांची एक भरीव टीम आहे जो त्याच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. तसंच श्लोकच्या Tech Burner चॅनेलचे युट्युबवर सध्या 92 लाखांपेक्षा अधिक Subscribers आहेत. तर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही लाखोंमध्ये फॉलोअर्स आहेत.

श्लोक सारखं आपणही Tech चॅनेल सुरु करावं असं अनेक तरुणांना वाटतं पण त्यामागे श्लोकने केलेली इतके वर्षांची मेहनत आहे. त्यामुळेच एका मिडल क्लास कुटुंबात जन्मलेला श्लोक आज यशाच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचला आहे.

First published:

Tags: Career, Digital prime time, Success story, Technology, YouTube Channel