शून्यातून यशाच्या शिखरावर जाणाऱ्या अनेक सक्सेस स्टोरीज आपण आजपर्यंत ऐकल्या आहेतआणि पाहिल्या आहेत. पण आज आम्ही तुम्हाला ज्या मराठी मुलीबद्दल सांगणार आहोत ती सर्वांपेक्षा वेगळी आहे. याच कारण म्हणजे तिनं फार कमी काळात आणि फार कमी वयात मिळवलेलं बेसुमार यश. हो आम्ही बोलत आहोत सोशल मिडीयावर तरुणाईची लाडकी मराठी मुलगी MostlySane बद्दल. म्हणजेच ‘प्राजक्ता कोळी’ बद्दल. YouTube वर तिचे दर आठवड्यात येणारे व्हिडीओ असो वा तिच्या इंस्टाग्राम स्टोरीज आजकालची तरुण पिढी MostlySane फॉलो करत नाही असं होऊच शकत नाही. कोणी तिला सुपर क्युट म्हणतं तर कोणी दीदी. तिच्या #sawalsaturday व्हिडिओला अगदी वृद्ध व्यक्तींपासून तर शालेय मुलांचेसुद्धा तिला प्रश्न असायचे. आज प्राजक्ता कोळी हे नाव फक्त भारतातच नाही तर जगात ओळखलं जातं. पण प्राजक्ताचा प्रवास नक्की सुरु झाला कसा? कशी बनली Mostlysane एक यशस्वी YouTuber हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. ठाण्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मध्यमवर्गीय मुंबईकर प्राजक्ता कोळीने मुंबई विद्यापीठातून मास मीडियामध्ये पदवी पूर्ण केली. मोठी झाल्यावर तिच्याकडे नेहमीच एक हातोटी होती आणि ती एक रेडिओ जॉकी व्हावी अशी तिची इच्छा होती. असं करत असताना तिला रेडिओ जॉकी म्हणून इंटर्नशिप मिळाली. मात्र फार रात्रीचा शो असल्यामुळे तिचं मन त्यात रमत नव्हतं. प्राजक्ताने एकदा इंस्टाग्राम व्हिडीओ बनवल्यानंतर पोस्ट केला त्यानंतर वन डिजिटल एंटरटेनमेंट मधील सुदीप लाहिरी यांच्या संपृक्त येण्याचा चान्स मिळाला. त्यांनी तिच्यामध्ये क्षमता आणि प्रतिभा पाहिली आणि तिला स्वतःचं YouTube चॅनेल सुरू करून ते एक्सप्लोर करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला प्राजक्ताला ही कल्पना पटली नाही कारण यूट्यूब हा करिअरचा फारसा विश्वासार्ह पर्याय विशेषत: भारतासारख्या देशात मानला जात नव्हता. यावर थोडा वेळ विचार केल्यावर आणि तिच्या रेडिओ कारकीर्दीत ती फारशी चांगली कामगिरी करत नाही हे लक्षात आल्यावर, तिने शेवटी YouTube सामग्री निर्मिती बाजूला घेण्याचे ठरवले आणि 2015 साली ‘MostlySane’ म्हणून आज आपण सर्वजण ओळखत असलेलं चॅनेल सुरु केलं. तिने पदार्पण म्हणून ‘Types of Singles on Valentine Day’ या शीर्षकाचा एकपात्री अभिनय म्हणून तिचा एक व्हिडिओ अपलोड केला, ज्यामध्ये तिने अपलोड केल्याच्या अवघ्या काही मिनिटांत 1000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळवून प्रेक्षकांमध्ये खूप खळबळ माजवली. हाच तिच्यासाठी टर्निंग पॉइंट होता जेव्हा तिने ठाम निर्णय घेतला आणि आरजेची नोकरी सोडली आणि YouTube ला पूर्णवेळ करिअर म्हणून स्वीकारलं. पण प्राजक्ता इतक्यावरच थांबली नाही तर तिनं स्वतःची प्रगती सतत सुरु ठेवली. प्राजक्ता लोकांना आवडण्यामागे आणि तिच्या कन्टेन्टची अपेक्षा करण्यामागील मुख्य कारणांपैकी एक आहे. ती ज्या प्रकारे सामान्य माणसांशी झटपट जोडते ते तिला गर्दीपासून वेगळे करतं. खरं तर, जर तुम्ही तिला Instagram वर फॉलो केलं तर तुम्हाला तिच्या पोस्ट्स आणि स्टोरी दिसतील ज्या तिच्या दैनंदिन जीवनशैलीचे अगदी नैसर्गिक आणि स्पष्ट चित्रण आहेत जसं की व्यायाम करणं, पुस्तक वाचणं, कौटुंबिक वेळ इत्यादी त्यामुळे अनेकांना ती आपल्या घरचीच कोणी व्यक्ती आहे असं वाटतं.
मराठी लोकांना बॉलिवूडमध्ये निम्न दिली जाते हे म्हणणाऱ्या लोकांसाठी प्राजक्ता कोळी सडेतोड उत्तर आहे. प्राजक्ताने युट्युच्या प्रवासासोबतच बॉलिवूडमधेही स्वतःचं नाव कोरलं आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या जुग जुग जिओ या सिनेमात तिने काम केलं आहे. तर अनेक बॉलिवूड सिलेब्रिटीजसोबत तिने काम केलं आहे. युनायटेड नेशन्समध्ये तिनं भारताचं प्रतिनिधीत्वही केलं आहे. सध्या प्राजक्ताच्या MostlySane या युट्युब चॅनेलवर तिचे तब्बल 67 लाख Subscribers आहेत तर इंस्टाग्राम आणि ट्विटरवरही तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तसंच प्राजक्ता भारताची पहिली UN Development Programme (UNDP) Youth Climate Champion आहे. यश काय असतं आणि यश मिळाल्यानंतरही नम्र कसं राहायचं हे आजच्या तरुण पिढीनं प्राजक्ताकडून शिकण्यासारखं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.