मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Inspiring: बॅकबेंचर बनला IAS ऑफिसर; कुमार अनुराग यांच्या स्वप्नांचा प्रवास

Inspiring: बॅकबेंचर बनला IAS ऑफिसर; कुमार अनुराग यांच्या स्वप्नांचा प्रवास

अनुराग यांनी केवळ जिद्दीच्या जोरावर IAS बनून दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे.

अनुराग यांनी केवळ जिद्दीच्या जोरावर IAS बनून दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे.

शालेय अभ्यासात साधारण विद्यार्थी असूनही कुमार अनुराग (Kumar Anurag) यांनी स्पर्धा परीक्षा (UPSC Exam) देण्याचा निर्णय घेतला.

दिल्ली, 2 जून: आपण सगळेजण शालेय अभ्यासाला (UPSC Study) महत्त्व देतो. मुलगा शाळेमध्ये हुशार असेल तरच त्याचं करिअर (Inpiring Career) चांगलं होईल असा आपला सगळ्यांचा विश्वास असतो. त्यामुळे मुलांनी दरवर्षी चांगले मार्क मिळवावेत म्हणून पालक मुलांवर दबाव (Parents put Pressure on Children) टाकत असतात. मात्र, काही मुलं अशी असतात जी शाळेमध्ये चांगले मार्क्स मिळवत नाहीत मात्र, तरीदेखील आयुष्याच्या एका वळणावर असं यश (IAS Success story) मिळवतात की आपले डोळे दिपून जातात. असाच एक विद्यार्थी आहे कुमार अनुराग (IAS Kumar Anurag).

कुमार अनुराग हे शाळेमध्ये हुशार विद्यार्थी नव्हते त्यांनी बिहार मधून एका हिंदी मीडियम शाळेमधून आपलं सुरुवातीचं शिक्षण केलं. त्यानंतर दहावीसाठी त्यांना दुसऱ्या शहरात ऍडमिशन घेण्यात आलं. ही शाळा इंग्लिश मीडियम असल्यामुळे सुरुवातीला अनुराग यांना अनेक अडचणी आल्या.

(अरे देवा! कोरोनानंतर आता H10N3; जगात चीनमध्येच सापडला पहिला रुग्ण)

हिंदी मिडीयम मधून असल्याने इंग्लिश मीडियमचा अभ्यास करताना त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. दहावीच्या पूर्व परीक्षेमध्ये ते नापस देखील झाले होते. मात्र, तरीदेखील जिद्दीने अभ्यास करून अनुराग दहावीमध्ये 90 टक्के गुण मिळवून पास झाले. बारावीमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. बारावीच्या पूर्व परीक्षेमध्ये अनुराग गणितामध्ये नापास झाल्यानंतर मुख्य परीक्षेत मात्र, त्यांनी 90 टक्के गुण मिळवले. कॉलेजमध्ये देखील त्यांनी फार लक्ष देऊन त्याचा अभ्यास केला नाही. कॉलेजमध्ये नेहमीच पाठीमागच्या बेंचवर (Back Bencher) बसायचे आणि हुशार विद्यार्थ्यांच्या नोट्सचे झेरॉक्स काढून आपला अभ्यास करायचे.

(तुमच्या शरीरात दिसतात ही लक्षणं; असू शकते Vitamin C ची कमतरता)

त्यांनी दिल्लीच्या के श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स (Shriram College of Commerce,Delhi) मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये(Delhi School of Economics)एमएसची डिग्री घेतली. शाळेपेक्षा कॉलेजमध्ये त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. मात्र, तरीदेखील अनुराग यांनी हिंमत हरली नाही. त्यांनी पूर्ण मेहनतीने कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच वेळेस IAS ऑफिसर बनण्याचा निर्णय घेतला.

(हे तेल वजन वाढवत नाही तर कमी करतं, नियमित वापरणं ठरू शकतं फायदेशीर)

त्यासाठी त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. स्वत: नोट्स बनवल्या आणि 2017 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते UPSC पास झाले. UPSCमध्ये त्यांना 677वा रँक मिळाला. त्याने कुमार अनुराग यांचं समाधान झालं नाही. त्यांनी पुन्हा एकदा UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि 2018ला 48 रँक मिळवला आणि IAS ऑफिसर बनले. संघ लोक सेवा आयोगाच्या सिविल सेवा परीक्षेला देशातली सगळ्यात कठीण परीक्षा मानलं जातं. दरवर्षी देशभरामध्ये 4 लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र, यश फार कमी विद्यार्थ्यांना मिळतं. त्यातलेच एक कुमार अनुराग देखील आहेत. शालेय दिवसांमध्ये अभ्यासाची फारशी आवड नसलेल्या अनुराग यांनी केवळ जिद्दीच्या जोरावर IAS बनून दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे.

First published:

Tags: Inspiration, Inspiring story, Success, Success story, Successful Stories