जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / विद्यार्थ्यांनो, तुम्हालाही जर्मनीत उच्च शिक्षण घ्यायचंय? मग 'या' स्कॉलरशिप्सच्या मदतीनं स्वप्न होईल पूर्ण

विद्यार्थ्यांनो, तुम्हालाही जर्मनीत उच्च शिक्षण घ्यायचंय? मग 'या' स्कॉलरशिप्सच्या मदतीनं स्वप्न होईल पूर्ण

'या' गोष्टी करायला विसरू नका

'या' गोष्टी करायला विसरू नका

आज आम्ही तुम्हाला अशा काही स्कॉलरशिप्सबद्दल माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला जर्मनीत शिक्षण घेताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 मार्च: परदेशात शिकण्याचं (Study in Abroad) अनेकांचं स्वप्नं असतं. मात्र कधी आर्थिक परिस्थतीमुळे तर कधी कुटुंबाच्या जबाबदारीमुळे विद्यार्थ्यांना ते पूर्ण करता येत नाही. जगभरातील अनेक देशांमध्ये भारतीय विद्यार्थी शिकण्यासाठी (How to apply for study in foreign) जातात. यातील काही देशांमध्ये अगदी कमी खर्चात शिक्षण होतं तर काही देशांमध्ये मात्र खूप पैसे मोजावे लागतात. त्यात इंजिनिअरिंग आणि इतर क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी (Higher studies in Germany) जाताना विद्यार्थी जर्मनी या देशाचा विचार करतात. मात्र जर्मनीमध्ये शिक्षण (How to study in Germany) घेण्यासाठी प्रचंड पैसे लागतात. चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्कॉलरशिप्सबद्दल (Important Scholarships to study in Germany) माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला जर्मनीत शिक्षण घेताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. चा तर मग जाणून घेऊया. Success Story: 12वीत झाली नापास तरीही सोडली नाही जिद्द; 22व्या वर्षी झाली IAS

 द जर्मन चान्सलर फेलोशिप (THE GERMAN CHANCELLOR FELLOWSHIP)

अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट फाउंडेशन ब्राझील, भारत, रशिया आणि अमेरिका यांसारख्या देशांतील पदवीधर विद्यार्थ्यांना दरवर्षी ५० जर्मन चांसलर फेलोशिप प्रदान करते. यासाठी अर्जदार भारत, रशिया, चीन किंवा ब्राझीलचा नागरिक असणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीसाठी, विद्यार्थ्याला स्वतःचा प्रकल्प तयार करावा लागेल आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी होस्ट शोधावा लागेल. या स्कॉलरशिप अंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा 2150, 2450 आणि 2750 युरो पर्यंत शिष्यवृत्ती मिळते. शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या पात्रतेवर अवलंबून असते. या शिष्यवृत्तीमध्ये गतिशीलता भत्त्यासह आरोग्य आणि दायित्व विमा समाविष्ट आहे. ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी दरवर्षी सप्टेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत अर्ज करावा लागतो. http://www.humboldt-foundation.de/buka या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांना यासाठी थेट अर्ज करता येईल. अमिराना स्कॉलरशिप (AMIRANA SCHOLARSHIP) ISC शिष्यवृत्ती हेडलबर्ग विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी 2016 मध्ये सुरू केली होती. या शिष्यवृत्तीमध्ये विकसनशील देशांतील विद्यार्थ्यांना हेडलबर्ग विद्यापीठातून मेडिसिन आणि डेंटिस्टचा कोर्स करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अर्जदार विद्यार्थी विकसनशील देशाचा असणं आवश्यक आहे. या स्कॉलरशिपची रक्कम दर महिन्याला 300-600 युरो इतकी आहे. भारतातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी Canada लाच का देतात पसंती? इथे मिळेल उत्तर

 ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी दरवर्षी जुलै महिन्यात अर्ज करावा लागतो. http://www.alumni.uni-heidelberg.de/en/service_amirana.html या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांना यासाठी थेट अर्ज करता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात