Home /News /career /

प्रोफेशनल कोर्सेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार CET; या आहेत परीक्षेच्या तारखा

प्रोफेशनल कोर्सेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार CET; या आहेत परीक्षेच्या तारखा

प्रोफेशनल कोर्सेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी CET परीक्षा द्यावी लागणार आहे.

    मुंबई, 04 ऑगस्ट: बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी कॉलेजमध्ये (Admissions after 12th) प्रवेश घेण्यासाठी साधारणतः CET म्हणजेच प्रवेश परीक्षा (MHT-CET exam) द्यावी लागते. मात्र यंदा कोरोना असल्यामुळे ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार नाही अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांच्याकडून करण्यात आली. मात्र प्रोफेशनल कोर्सेसमध्ये प्रवेश (Professional courses entrance exam) घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी CET परीक्षा द्यावी लागणार आहे. उच्च शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन्स (Science), कॉमर्स (Commerce) आणि आर्ट्स (Arts) या शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षा यंदा घेण्यात येणार नाही. मात्र व्यावसायिक अभ्यासक्रम, मॅनेजमेंट अभ्यासक्रम आणि लॉ अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणारया विद्यार्थ्यांना CET देणं अनिवार्य असणार आहे. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (Bachelor of Hotel Management), मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (Master of Hotel Management), बी एड (B.Ed.), एम बी ए (MBA), एम सी एम (MCM), आर्किटेक्चर (B.Arch.) ,लॉ (LLB) या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना CET म्हणजेच प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. हे वाचा - 12वीनंतरची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून होणार सुरु; उच्च शिक्षणमंत्र्यांची घोषणा कधीपासून सुरु होणार CET प्रोफेशनल कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 26 ऑगस्टपासून 2021 पासून CET परीक्षा सुरु होणार आहे आणि यासंबंधीचा टाइम टेबल लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी CET दोन सत्रात घेतली जाणार आहे. पहिलं सत्र 4  सप्टेंबरपासून सुरु होणार आहे तर दुसरं सत्र 14 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. कॉलेजेस होणार सुरु सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्यामुळे कोविडची स्थिती बघून पुढचं शैक्षणिक वर्ष फिजीकली (College reopening in Maharashtra) सुरू करणार अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. हे शैक्षणिक वर्ष कधी पासून सुरु होणार आणि कॉलेजेस पुन्हा कधीपासून सुरु होणार याबद्दलचा निर्णय येत्या 8 दिवसात घेणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी परिस्थिती आहे त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू होताना निकष वेगळे असतील असंही त्यांनी म्हंटलं आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या