जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / हवामान विभागात लाख रुपये पगाराच्या नोकरीची शेवटची संधी; अर्ज करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक

हवामान विभागात लाख रुपये पगाराच्या नोकरीची शेवटची संधी; अर्ज करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक

कर्मचारी निवड आयोग (SSC)

कर्मचारी निवड आयोग (SSC)

कर्मचारी निवड आयोगानं भारतीय हवामान विभागातील 990 पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 18 ऑक्टोबर:   भारतीय हवामान विभागात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या विभागात तब्बल 990 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. कर्मचारी निवड आयोगद्वारे (SSC) ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. कर्मचारी निवड आयोगानं भारतीय हवामान विभागातील 990 पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी ही भरती असणार असून, अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख उद्या, म्हणजेच 18 ऑक्टोबर 2022 असणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार एसएससीची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ही परीक्षा डिसेंबर 2022 मध्ये होणार आहे. वैज्ञानिक सहाय्यकाच्या रिक्त पदांसाठी अर्ज केल्यानंतर परीक्षा फी बँक चलनाद्वारे भरावी लागेल. अधिसूचनेनुसार, बँक चलन भरण्यासाठी शेवटची मुदत 19 ऑक्टोबर 2022 आहे. तर, यशस्वीरित्या अर्ज केलेले उमेदवार 25 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जामध्ये बदल करू शकतील. क्या बात है! जगातील ‘ही’ मोठी कंपनी भारतात करणार तब्बल 20,000 जागांसाठी भरती; तरुणांना मिळेल जॉब्स शैक्षणिक पात्रता हवामान विभागातील वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी उमेदवार हा फिजिक्स/कॉम्प्युटर सायन्स/आयटी या विषयांत बॅचलर म्हणजेच पदवीधर असावा, किंवा किमान 60 टक्के गुणांसह त्याने डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. यासोबतच, उमेदवार हा फिजिक्स आणि गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वय 30 वर्षे आहे. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल. अशी असेल निवड प्रक्रिया भारतीय हवामान विभागातील वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी सीबीटी (CBT) टेस्टच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. पेपरचे दोन भाग असतील. पहिल्या भागात जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज आणि जनरल अवेअरनेस यावर आधारित 25 प्रश्न विचारले जातील. तर दुसऱ्या भागात कॉम्प्युटर सायन्स आणि आयटी संबंधित प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा दोन तासांची असेल. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी; वेळ घालवू नका; अर्जाची आजची शेवटची तारीख दरम्यान, वैज्ञानिक सहाय्यक या पदाच्या तब्बल 990 जागा भारतीय हवामान विभागात भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येत आहेत. पण यासाठी अर्ज करण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत, त्यांनी आजच ऑनलाइन अर्ज करून 19 ऑक्टोबर 2022 पर्यंत बँकेत चलन भरण्याची गरज आहे. अन्यथा तुमच्या समोर आलेली ही नोकरीची संधी हातातून जाण्याची शक्यता आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात